Skip to main content

औषधोपचार

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 29/08/2017 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.

मला भेटलेले रुग्ण - ८

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 29/08/2017 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40626 डॉक्टर परवा पासून खूपच त्रास वाढलाय हो खोकल्याचा , मधले ३ महिने ईतका कमी झाला होता की आता त्रासच संपला वाटत होतं.... जरा त्राग्यानेच बोलत होती पेशंट... मी फाईल बघत बघत ऐकून घेतलं आणि बोललो की तुम्हाला फक्त खोकल्याचा त्रास नाही होत आहे , अजून काय अडचण आहे ते सांगा ... कारण नेहेमी नवऱ्यासोबत येणारी पेशंट आज वडिलांसोबत आली होतीं... BP मोजलं.... पेशंट calm down होतात ... डाॅक्टरनी जर पेशंटला स्पर्शच नाही केला तर ,समजूनच घेता येत नाही ....

लिखाण

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 21/08/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

मला भेटलेले रुग्ण - ७

लेखक डॉ श्रीहास यांनी बुधवार, 16/08/2017 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40563 सकाळची OPD सुरू झाली तोच अमोल चा फोन आला (psychiatrist आहे हा) ... "अरे एक पेशंट पाठवतोय depression ची केस आहे , पण सतत दम लागतोय म्हणे अगदी बसल्या बसल्या पण ".... "बरं , बघून सांगतो " म्हणून मी फोन ठेवला आणि कामाला लागलो.. २ तासांनंतर ती पेशंट आणि तिचा नवरा आले , प्राथमिक तपासणी केली आणि श्वसनक्षमतामापन तपासणी ( spirometry ) साठी पाठवलं .....

पैठणी दिवस भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 12/08/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

मला भेटलेले रुग्ण - ६

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 11/08/2017 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40524 डॉक्टर बासरी वाजवता येईल का मला ? असं विचारलं मला पेशंटनी ..... मला लक्षात आलं कि काय गडबड झालीये ती !! मी : कोण म्हणालं नका वाजवू ? पे. : एके ठिकाणी वाचलं होतं कि दमा असलेल्यानी बासरी वाजवू नये म्हणून .. मी : साफ चुक लिहीलंय .... पे. : म्हणजे मला बासरी वाजवायला काहीच हरकत नाही (चेहेरा खुलायला सुरू झाला ) मी : अगदी काहीच हरकत नाही , उलट बासरीवादनाचा फायदा असा आहे की तुमच्या श्वासाची क्षमता किती वाढली आहे ह्यॅचा अंदाजा येईल आणि श्वासाच्या स्नायूंचा व्यायाम होईल नियमीत ... पे.

मला भेटलेले रुग्ण - ५

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 08/08/2017 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40470 काका मोठ्या उत्साहानी सांगत होते ....inhaler च्या वापरानी ५०% टक्के आराम पडला आणि आता खुपच फ्रेश वाटत आहे ; पण त्यांचं inhaler वापरण्याबाबात अजूनही थोडसं confusion आहेच ........ मी म्हणालो की inhaler कसं घेतात ते दाखवा मला , तुमची घेण्याची पद्धत बघूयात आणि काय चुकतंय किंवा कुठे confuse होताय ते कळेल त्याप्रमाणे मी correction सांगतो..... काकांनी inhaler काढलं स्पेसरला जोडलं (स्पेसर - inhaler घेतांना वापरलं जाणारं उपकरण , स्पेसर चा वापर ह्यॅसाठी केला जातो की inhaler मधून स्प्रे च्या रुपात निघणारं औषध ताशी १२०-

मला भेटलेले रुग्ण - ४

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 04/08/2017 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40426 सीन न. १ तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?" "कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!" "कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...." मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत " सीन नं.

मला भेटलेले रूग्ण - ३

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 31/07/2017 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40338 ६-७ ठिकाणी फिरून आली होती ; ती व तिचा नवरा कंटाळून बसले होते समोर ... त्याच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती .... बरेच महिने झाले , ॲलर्जीचा त्रास काही कमी होत नव्हता बरेच दवाखाने झाले बरीच औषधं घेतली पण फरक पडत नव्हता ... "पहले दवा लेते थे तो जरासा आराम होता था अब तो बिलकुल भी नही " रडवेली होऊन बोलत होती आणि काहीतरी करा पण मला ह्यॅतून बाहेर काढा असा स्वर होता तिचा ... असे पेशंट बरेचदा औषधांपेक्षा डाॅक्टरच्या शब्दांनी बरे होतात (स्वानुभव आहे)..... कधी कधी फक्त ऐकून जरी घेतलं ना तरी ५०% आजार कमी होतो....

मला भेटलेले रुग्ण - २

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 24/07/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला भेटलेले रुग्ण त्या बाईंच्या चेहेऱ्यावर ईतकं मोठं प्रश्न चिन्ह होतं की प्रश्न छोटा पडावा !! बाई : डॉक्टर हा दमा नाही म्हणून सांगा (बोलतांनाही दम लागतोय ) मला दमा नकोय हो.... मी : अहो तपासणी तर करू द्या ना , मगच ठरेल दमा आहे किंवा नाही ... आणि १००% आटोक्यात आणू तुमचा त्रास .. बाई : मला ते inhaler वगैरे काही नको नुसत्या गोळ्या औषधी द्याल हो... (परत दम लागतोय) मी : बरं बघू ,रिपोर्टस् आल्यावर ...