रौद्ररस

शिवस्तुती

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
6 Jul 2017 - 4:40 pm

आदिदेव महादेव नटभैरव नटरंग
करी तांडव आंदोलन होई भयकंपन

नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल
दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण

महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन
विरक्त महायोगी महागुरू जगत्कारण

भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन
भावभोळा शिवशंकर होई वरदायक

देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हां तारक
गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक

कवितारौद्ररस

हे फक्त माणसातच !

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
7 Apr 2017 - 12:48 am

रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला
बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात.
माणूस पळू लागला कि,
त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात.
त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात.
मासे मिळताच बोकेमांजरे
माणसाला तिथेच सोडून देतात.
हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे!

मासे मिळाल्यावर,
मासे तर फस्त करायचेच
पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत
त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे,
मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे .......
हे मात्र फक्त माणसातच !

- शिवकन्या.

मांडणीवावरवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमानइशाराकविता माझीभयानकबिभत्सरौद्ररस

स्पेशल महापुरूष

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जे न देखे रवी...
4 Apr 2017 - 1:17 pm

आता आता कुठं
तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष
एका एका जातीचा एक एक
स्पशेल महापुरूष
मग अपोआपचं वाटले गेली
रंग, तळी, डोंगर नदया ,गाव
नि गल्ल्या बोळी,मोहल्ले
कॅलेडरवरल्या तारखासुध्दा
सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने
जो तो विणत गेला आपल्याच
जातीचं कोष
गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत
माणूसजाती जातीच्या कशाल्याशा
गर्वानं फुगून
फुटू लागली सा-यांचीचं
छाताडं.
ते समतेचं गाणं
कसं काय गायचं बुवा
एक सुरात
एका तालात
परशुराम सोंडगे,पाटोदा

कलाकवितारौद्ररस

( वरपरीक्षा )

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
31 Mar 2017 - 11:54 pm
धोरणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयमुक्तकविडंबनशब्दक्रीडासमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजाmango curryअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीइशाराकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडछावाजिलबीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीसांत्वनाहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरस

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Dec 2016 - 10:41 am

मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा

फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर

मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर

फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर

तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर

नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर

पाकक्रियावाङ्मयऔषधोपचारकृष्णमुर्तीशिक्षणeggsअदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कवितारौद्ररस

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
19 Nov 2016 - 10:11 am

लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....

काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,

सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,

काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,

परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,

-(पैजारबुवा) आनंदीआनंद

बालकथाउखाणेशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्तीmango curryअदभूतआता मला वाटते भितीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीरौद्ररस

होऊंदे खर्च

सुरवंट's picture
सुरवंट in जे न देखे रवी...
22 Aug 2016 - 9:08 pm

तांब्याधिपतींना अर्पण..

*|| फक्त तू खचू नकोस ||*

रडू नकोस चिडू नकोस
टमरेल घेऊन फिरु नकोस
गुर्जीनं सांगितलंय म्हणून...
बाकी खर्च करु नकोस

संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...

रोज नव्याने लागते (रांग)
रोज नव्या तेजाने
रांगेतच ऊभा राहा
रोज नव्या जोमाने

येणे जाणे रितच इथली,
हे तू विसरु नकोस ...
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...

तुझ्या टमरेलकडे वळणारे
कितीतरी हात आहेत
अरे तेही तुझ्यासारखेच
पाणी त्यांना देऊ नकोस

गुंतवणूकvidambanजिलबीभूछत्रीरौद्ररस

गेम = डुआयडी

मंदार भालेराव's picture
मंदार भालेराव in जे न देखे रवी...
8 Aug 2016 - 7:52 pm

प्रेरणा : गेम

आयडी कसा बदलता आला पाहिजे
डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे

वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे
सगळ्यांना हे जमतंच असं नाही...
धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही

तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत..
सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं ..
'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज'
करत...

कवितामुक्तकविडंबनफ्री स्टाइलकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररस

कवी हूँ मैं

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
23 Jul 2016 - 8:34 pm

"कवींनी धुमाकूळ घातलाय
निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे
ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत
ते ट्विटरची टाइमलाईन
कवीच कवी सापडतात
इकडेतिकडे चोहीकडे
एक जागा मोकळी सोडली नाही..
गझला काय, चारोळ्या काय
अरे दीर्घकाव्य लिहून
उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा?
'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की
पळत सुटतात सगळे सैरावैरा
कवींना दिलंय आपण मोकळे रान
आपले व्हाट्सऍप खुले सोडले
दिली आपली व्यासपीठं आंदण..
व्यासा, तू पण कवीच होतास ना रे?

आता यावर एकच उपाय उरलाय......"

कवितामुक्तकइशाराहास्यवीररसरौद्ररस

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
22 Mar 2016 - 9:31 am

उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..

संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..

विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...

धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा

मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..

त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..

कविताचारोळ्यामुक्तकविडंबनमौजमजाअविश्वसनीयकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीछावाफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारोमांचकारी.भयानकहास्यवीररसअद्भुतरसरौद्ररस