शांतरस
रेघ
प्रेषक, मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 14/05/2013 - 15:18पिकासोपासून हुसेनपर्यंत कोणाचेही कुठलेही
चित्र ऊचलून पहावे
प्रत्येक चित्रात एक विविक्षित रेघ असते
खरं तर भव्य कॅनव्हासवर ती अगदीच
लहानशी असते
अहो ते पिकासो अन् हुसेनही जाऊ दे
मोरपीस पाहिलयं कधी निरखुन?
त्या सुंदर रंगसंगतीतही एक बारीक रेघ असते
पिसाच्या बरोब्बर मधोमध
बर्याचदा या रेघेचा संदर्भ चित्रकारालासुद्धा
समजलेलाच असतो असेही नाही
पण
त्या रेघेशिवाय चित्र मात्र अपूर्ण असते
माझ्या असण्यामध्ये तुझे अस्तित्व
त्या रेघेसारखे आहे
----
एकाकी तळ्याच्या
नितळ पाण्यात दिसण्यार्या
रुसवा
प्रेषक, अज्ञातकुल, Tue, 14/05/2013 - 10:53कबूल नाही नसलेपण तव
निगूत जपले आहे वैभव
सरले ऋतू कितीक युगाब्धे
हिरमुसले ना जीवन लाघव
अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव
भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव
............................अज्ञात
आस
प्रेषक, अज्ञातकुल, Thu, 02/05/2013 - 19:57मन नाही नाही म्हणते पण
हृदयात आस घन कळवळते
दरवळ मृगजळ मेघांचा
अंतरी आर्त अन वादळते
गोकुळ स्वप्नांची सलगी
जिरवून कथानक वावरते
तापल्या काहिली तृप्त
माळभर धुंधुर माया हिरवळते
ओठात शब्द स्वर कंठातिल
भावना लास्यमय ओघवते
आशेस किनारा वाळूचा
दर्पणी कामना विरघळते
....................अज्ञात
प्रवास
प्रेषक, मिसळलेला काव्यप्रेमी, Thu, 25/04/2013 - 18:22प्रवास चालू आहे माझा
शून्याकडून क्षितिजाकडे
.
.
अथक,
अविरत
.
.
थांबता नाही येणार मला
खूप थकलोय, पण
थांबलो तर मन रागावेल
आणि पाय तर चालायला नकार देतायत
जाऊन जाऊन कुठे पोहोचणार?
क्षितीज तर एक रेघ..
आणि शून्य? ते काय?
सुरवात केलेल्या बिंदुला
गोल फिरून पोहचणारी
एक वळसे घेणारी रेघच ना?
.
.
मग का चालावे?
पण मन, ते का ऐकत नाही?
मनालाच ठाऊक
विचारले जरी
सांगता थोडीच येणार आहे त्याला?
आणि सांगितलेच तरी
कळणार कोणाला इथे?
जाऊ दे
नायक क्रमांक एक
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Tue, 02/04/2013 - 16:17आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
दुष्काळ
प्रेषक, मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 11/03/2013 - 08:35पाऊस अडतो, माती काळी
कातर वेळी, रिक्त झोळी
थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ
मोठ्या चेहर्यावर, छोटे कपाळ
वितभर पोटास, पेरभर अन्न
मुठभर काळीज, सुन्न सुन्न
झकपक विज, शहरी वेग
गाव आंधळे, भुईला भेग
राऊळाशी रांग, लांबच लांब
विठू न राखे, त्याचाच आब
कां रे असे, जगणे विटाळ?
रात्र काळ, दिवस दुष्काळ!
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०५/०३/२०१३)
आठवण...
प्रेषक, अत्रुप्त आत्मा, Wed, 06/03/2013 - 00:10आठवणींनी जीव माझा
बेचैन किती जाहला?
सखये तुझा कुठे तो...
माझाही न राहिला.
दूर किती दूर जाशी
लागे मज हुरंहूरं
शांत आहे ही तृप्तता
की भावनांचे काहूरं?
वेड असे भीत आहे
हाक कशी देऊ मी?
का तुझिया स्मरणाने
फक्त तृप्त होऊ मी???
आसवांचे नजराणे
का मागे प्रीत ही?
सहजाच्या जगण्याची
का अल्लड रीत ही?
दु:ख्ख असे आज नाही
जरी न तुझा राहिलो
देवालयी पुष्पांसम
निर्माल्य अता जाहलो.
श्रीराम
प्रेषक, अनिल आपटे, Tue, 05/03/2013 - 11:33मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे
पहा तुम्हाला आवडते का
श्रीराम
विसावले मन माझे श्रीराम चरणी
भास मात्र होतो खास माउलींचा मनी
राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई
अमृताची गोडी अनुभवास येई
वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १
नामाचा महिमा आहे अनंत अपार
सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर
मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २.
दिनांचा दयाळू मनाचा मवाळू
तसा माझा सदगुरु नेई पैलपारू
सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३.
जय श्रीराम
नकोच शिवबा, जन्म इथे तू पुन्हा कधी घेऊ -
प्रेषक, विदेश, Thu, 21/02/2013 - 12:07नकोच शिवबा, जन्म कधी तू पुन्हा इथे घेऊ
कर्तव्याची नाही जाणिव, जयघोषातच दंगुन जाऊ
नाही येथे कुणी जिजाऊ- शिकवण्यास बाळा
म्हणती भाऊ तरि ते टपले दाबण्यास रे गळा ,
येथ जाणती बळ एकीचे जरी सर्व लोक
गडबडती स्वबळावर जगण्या कोपऱ्यात नेक -
शिवबा, तुजसाठी जगणारे संपले मर्द मावळे
आता उरले येथे सारे संधीसाधू डोमकावळे ,
पायपोस तो कुणास नाही उरला कुणाचा आता
सत्तेसाठी केवळ सारा आटापिटा पहाणे आता !
जन्मलास जरी आता शिवबा, इथल्या तू भूवरी
सिंहासन तव तुजसाठी नुरले हपापलेले भारी
स्वतंत्र
प्रेषक, अत्रुप्त आत्मा, Sun, 17/02/2013 - 21:05शब्दांनी सजवित जावे
वृत्तांचा ना हव्यास
मज वाटे कविता झाली
असतो रचनेचा भास
मी नाही कुठला पंथी
मज नकाच कोठे जुंपू
कुणी शोधित जाती खांब
मी माझा नाथ स्वयंभू
ही माझी स्वतंत्र रचना
हे माझे निराळे कूळ
तुंम्ही अर्थ शोधुनी जाता
तरी गवसत नाही मूळ
एकाकी या वळणावर
मी पुढे चालतो आहे.
शब्दांचा नाजुक गजरा
मी मनी माळितो आहे.
मज ठाऊक नाही पुढती
असणार कोठचे गाव?
नसतात तेथल्या गावी
कुणी राजा आणिक राव