छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता
नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - रस्ता. जो आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. जे छायाचित्र पाहिल्यावर रस्ता हा त्याचा मुख्य विषय वाटेल असे छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.