मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा.
१९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो.
रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी.
मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.)
यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो.
कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते.
आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा.
आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत.
१ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्..
२ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे.
३ एकाचा टोन बदलल्यावर .....
मित्रहो....
या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस.
जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा.
पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस.
शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे....
शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे...
स्पर्धेसाठी शुभेच्छा !
जयंत कुलकर्णी
संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
87757
प्रतिक्रिया
146
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन वेगळा विषय स्पर्धेला
वाह!
+१
In reply to वाह! by पैसा
सुंदर विषय, सॉलिड छायाचित्रे
प्रस्तावनेने स्पर्धेची
रंगीत काढलेले छायाचित्र
हो
In reply to रंगीत काढलेले छायाचित्र by टवाळ कार्टा
काहीही करा......
In reply to रंगीत काढलेले छायाचित्र by टवाळ कार्टा
उत्तम ! उत्तमोत्तम छायाचित्रे
मोबल्यावरुन काढलेले सेपिया
दोन्ही फोटो वेगळे आहेत की =))
In reply to मोबल्यावरुन काढलेले सेपिया by प्रमोद देर्देकर
टक्या
In reply to दोन्ही फोटो वेगळे आहेत की =)) by टवाळ कार्टा
खिक्क...इतके नक्को रे मनाला
In reply to टक्या by प्रमोद देर्देकर
सेपिया ह ब्लॅक अँड व्हाईअतचा
In reply to मोबल्यावरुन काढलेले सेपिया by प्रमोद देर्देकर
माझी एंट्री -
सही रे प्रभ्या
In reply to माझी एंट्री - by प्रभो
श्री. प्रभो.
In reply to माझी एंट्री - by प्रभो
धन्यवाद काका. फोटो आहे तसाच
In reply to श्री. प्रभो. by जयंत कुलकर्णी
छान फोटो .. माझे पण असेच आहे.
In reply to धन्यवाद काका. फोटो आहे तसाच by प्रभो
श्री. प्रभो,
In reply to माझी एंट्री - by प्रभो
धन्यवाद काका. नक्की लक्षात
In reply to श्री. प्रभो, by जयंत कुलकर्णी
.
ओ दादा
In reply to . by शब्दानुज
फोटो कसा टाकाय्चा... जरा
हे बघ
In reply to फोटो कसा टाकाय्चा... जरा by स न वि वि
(No subject)
मस्त
In reply to (No subject) by शब्दानुज
मस्त फोटो ...
In reply to (No subject) by शब्दानुज
शब्दानुज,
In reply to (No subject) by शब्दानुज
.
माफ करा
In reply to . by शब्दानुज
जुळून येती रेशीमगाठी ...............(स्पर्धेसाठी नाही )
माफी असावी 'स्पा'जी, पण हा
In reply to जुळून येती रेशीमगाठी ...............(स्पर्धेसाठी नाही ) by स्पा
शेम
In reply to माफी असावी 'स्पा'जी, पण हा by अनुप ढेरे
स्पा मला तरी हा फोटो खुप
In reply to शेम by स्पा
हा कुठे फडके रोडवर काढ ला का
In reply to जुळून येती रेशीमगाठी ...............(स्पर्धेसाठी नाही ) by स्पा
फडके रोडवर, हातात अंगठ्या
In reply to हा कुठे फडके रोडवर काढ ला का by चौकटराजा
प्रतिसाद प्रचंड आवडेश
In reply to हा कुठे फडके रोडवर काढ ला का by चौकटराजा
लेखन आवडले
तल्लिन
व्वा !
In reply to तल्लिन by सर्वसाक्षी
श्री. सर्वसाक्षी,
In reply to तल्लिन by सर्वसाक्षी
धन्यवाद
In reply to श्री. सर्वसाक्षी, by जयंत कुलकर्णी
आतापर्यंत आलेले तीनही फोटो
स्पर्धेसाठी दुसरा
कृपया एक कुठलातरी सांगावा....
In reply to स्पर्धेसाठी दुसरा by कंस
श्री कंस,
In reply to स्पर्धेसाठी दुसरा by कंस
इ ल्लो हम्री वेंट्री..
फारच भारी....
In reply to इ ल्लो हम्री वेंट्री.. by अत्रुप्त आत्मा
अतृप्तमहाराज,
In reply to इ ल्लो हम्री वेंट्री.. by अत्रुप्त आत्मा
गणेश विसर्जन - मुंबई (स्पर्धेसाठी )
श्री. स्पा,
In reply to गणेश विसर्जन - मुंबई (स्पर्धेसाठी ) by स्पा
कान्हेरी लेणी
श्री नीर,
In reply to कान्हेरी लेणी by नीर
तळपत्या उन्हात हे थंडगार लिंबू-सरबत :)
श्री मिनियन,
In reply to तळपत्या उन्हात हे थंडगार लिंबू-सरबत :) by मिनियन
..मुंबईचा सुर्यास्त.....!!!!
श्री विनोद,
In reply to ..मुंबईचा सुर्यास्त.....!!!! by विनोद१८
बरोबर आहे तुमचे.
In reply to श्री विनोद, by जयंत कुलकर्णी
काका एक प्रश्न आहे. क्षितीज
In reply to श्री विनोद, by जयंत कुलकर्णी
दोन सारखे भाग करु नयेत....असे
In reply to काका एक प्रश्न आहे. क्षितीज by कहर
माझी प्रवेशिका
श्री वेल्लाभट,
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
धन्यवाद
In reply to श्री वेल्लाभट, by जयंत कुलकर्णी
(No subject)
कविता१९७८,
In reply to (No subject) by कविता१९७८
माझी प्रवेशिका
.
In reply to माझी प्रवेशिका by Keanu
:-)
In reply to . by झकास
श्री. चिंटू,
In reply to माझी प्रवेशिका by Keanu