खाडीतली खारफुटी दुनिया १

खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा : निकाल

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११ प्रतीक्षा चा निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. विषय जरा कठीण ठेवल्यामुळे यावेळी चित्रे थोडी कमी प्रमाणात आली. मात्र लोकांनी चोखंदळपणे निवड केली आहे. इथे नोंदलेली मते आणि सं.मं. कडे कळवलेली मते विचारात घेऊन निकाल जाहीर करत आहोत. निकालाला काही अपरिहार्य कारणाने जरा उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व. स्पर्धेसाठी आलेली सर्वच चित्रे उल्लेखनीय होती. त्यातही पहिल्या क्रमांकाचे चित्र कोणते याबद्दल कोणालाही शंका नसेल! क्र.

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा: मतदान

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! या स्पर्धेचा विषय जरा अवघड होता, मात्र तरीही खूप सुरेख प्रवेशिका आल्या आहेत. हा धागा मतदानासाठी. तुमच्या पसंतीचे पहिले तीन क्रमांक या धाग्यावर ८ तारखेपर्यंत नोंदवा.

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखनविषय:
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

लेखनप्रकार
डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे.

बाटली आणि दारू.....

खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !!

पानिपत

लेखनप्रकार
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.

हम तो तेरे आशिक है...

सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा.
Subscribe to छायाचित्रण