छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५: कृषि: निकाल

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
11 Jan 2016 - 10:43 pm

नमस्कार मंडळी,
छायाचित्रणकला स्पर्धेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

यंदा प्रथमच प्रवेशिकांबरोबर स्पर्धकांची नावे प्रकाशित केली गेली नाहीत. नव्या पद्धतीला सर्व स्पर्धकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याकरिता सर्व स्पर्धकांना विशेष धन्यवाद. तसेच ज्यांच्या सहभागाशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे त्या मतदात्यांनाही अनेक धन्यवाद.
तृतीय क्रमांक मिळाला आहे, पॉइंट ब्लँक यांच्या कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेल्या भातशेतीच्या छायाचित्राला.
द्वितीय क्रमांक मिळाला आहे बोका यांच्या मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे या छायाचित्राला.
अन प्रथम क्रमांक मिळाला आहे मार्मिक गोडसे यांच्या तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणार्‍या शेतकर्‍याच्या छायाचित्राला.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की आगामी छायाचित्रण कला स्पर्धा मिपाकर सर्वसाक्षी आयोजित करणार आहेत.

छायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

अभिनंदन! नवीन फॉरमॅट आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2016 - 6:55 am | अत्रुप्त आत्मा

+१ हेच म्हणतो..आणि तो तसाच राहु द्या. म्हणजे व्यक्ति निष्ठ मतदान होणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2016 - 11:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फॉर्मेट आवडला. मतदान करतांना आता आपली आवड बिंधास्त सांगता येते.
शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

11 Jan 2016 - 11:31 pm | किसन शिंदे

तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन!

संजय पाटिल's picture

12 Jan 2016 - 6:06 am | संजय पाटिल

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!

भीमराव's picture

12 Jan 2016 - 6:20 am | भीमराव

बोलकी चित्रे

अजया's picture

12 Jan 2016 - 6:51 am | अजया

अभिनंदन!

प्रीत-मोहर's picture

12 Jan 2016 - 7:30 am | प्रीत-मोहर

Abhinandan!!!!

तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन.
तिसर्‍या फोटोत तळपते उन्ह मात्र दिसले नाही, उलट हिरवेगारपणामुळे वातावरण तसे आल्हाददायकच वाटतेय.

विशाल कुलकर्णी's picture

12 Jan 2016 - 9:18 am | विशाल कुलकर्णी

विजेत्यांचे अभिनंदन !

श्रीरंग_जोशी's picture

12 Jan 2016 - 9:35 am | श्रीरंग_जोशी

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

या फोटोचे विशेष कौतुक करावेसे वाटले.

ऋतुराज चित्रे's picture

12 Jan 2016 - 9:51 am | ऋतुराज चित्रे

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
साहित्य संपादकांचेही अभिनंदन्, अगदी वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धेचे मतदान व निकाल लावला गेला. नवीन फॉर्मेटमुळे निकालात पारदर्शकता आली आहे, त्यामुळे

जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.

अशा गुप्त मतदानाची गरज वाटत नाही.

कविता१९७८'s picture

12 Jan 2016 - 9:59 am | कविता१९७८

विजेत्यांचे अभिनंदन !

स्पा's picture

12 Jan 2016 - 10:30 am | स्पा

विजेत्यांचे अभिनंदन

आता बाकी फोटो कुणाचे होते ती नावे आली तरी चालतील कि, म्हणे त्यांचे पण अभिनंदन करू :)

पैसा's picture

12 Jan 2016 - 10:40 am | पैसा

सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! मार्मिक गोडसेंकडून थोडी माहिती पाहिजे. ते ड्रोन प्रकरण काय आहे?

विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन !!
पहिले दोन्ही अंदाज बरोबर आले, फक्त तिसरा क्रमांक वेगळा आला :)

अप्रतिम ! विजेत्यांचे अभिनंदन

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jan 2016 - 11:11 am | कैलासवासी सोन्याबापु

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन अन खुप खुप शुभेच्छा

सर्वसाक्षी's picture

12 Jan 2016 - 12:14 pm | सर्वसाक्षी

या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळाली

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2016 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

इतर स्पर्धकांची नावेही आता प्रकाशित करायला हरकत नसावी. त्यामुळे वाचकांना आवडलेल्या इतर चित्रांचे धनीही कळू शकतील.

मार्मिक गोडसे's picture

12 Jan 2016 - 12:36 pm | मार्मिक गोडसे

ते ड्रोन प्रकरण काय आहे?

Quadcopter (ड्रोन) हे रिमोटने हवेत उडवता येते व त्यातील बिल्टइन कॅमेराने विडीओ शूटिंग किंवा स्टील फोटोग्राफी करता येते. जेथे आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही तेथे ह्याचा उपयोग करता येतो. उदा: तळ्याचा टॉप व्ह्यू. मी वापरत असलेल्या Quadcopter बद्दल अधिक माहीती येथे मिळेल.

मी काढलेल्या वरील फोटोविषयी माहीती.
शेतात पाणी असल्याने व्यवस्थीत कोन मिळवायला शेतात उभे रहायला योग्य जागा मिळत नव्हती, माझ्याकडील DSLR कॅमेराने फोटो काढताना शेतकरी, शेत व सुर्य फ्रेममध्ये बसत नव्हते. Quadcopterमुळे मला हवा असलेला व्ह्यू. मिळाला. फिक्स लेन्स व फिक्स अपेर्चर असल्यामुळे Quadcopter ने फोटो काढताना मर्यादा येतात.

पैसा's picture

12 Jan 2016 - 5:15 pm | पैसा

अमेझॉनवर शोधले. आपल्या मोबाईल वगैरे डिव्हाईसने कंट्रोल करता येईल असेही ड्रोन्स मिळतात बहुधा. पण यांना सर्रास परवानगी असते का? गुप्तहेरगिरीसाठी वगैरे फारच सोयोस्कर प्रकरण दिसते आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Jan 2016 - 5:35 pm | स्वच्छंदी_मनोज

थोडे विषयांतर...

----
पैसा तै,

माझ्या माहीतीप्रमाणे भारतात अजूनतरी ऑफीशीयल ड्रोन्स पॉलीसी नाही. डीजीसीए अशी पॉलीसी तयार करत आहे आणी ती लवकरच अंमलात येईल. सध्या डीजीसीए ड्रोन्सचे कॅटेगेरायझेशन करते आहे जेणेकरून, मिलिटरी ड्रोन्स, इमेज मॅपीग ड्रोन्स (ISRO, DRDO etc), लॉजीस्टीक्स ड्रोन्स (जसे की अ‍ॅमॅझोन, पिझ्झा डीलीवरीज) आणी सिवील ड्रोन्स अश्या काही कॅटेगरीज साठी वेगवेगळ्या पॉलीसीज येतील.
ताज्या बातमीनुसार काही इंशुरंस कंपनीजनी ड्रोन्स वापरून पीक नुकसानीच्या विम्याची रक्कम ठरवता येईल अश्या पॉलीसीज बाजारात आणल्या आहेत किंवा आणणार आहेत.
ड्रोन्स हे अनमॅन्ड एरीयल वेहीकल्स मध्ये मोडत असल्याने त्यांच्या वापराच्या परवानग्यापण किचकटच असणार.

पैसा's picture

12 Jan 2016 - 5:50 pm | पैसा

त्याचा उपयोग होण्याच्या भरपूरच शक्यता दिसतात. सरकारला नियम तयार करावे लागतीलच.

मार्मिक गोडसे's picture

13 Jan 2016 - 5:29 pm | मार्मिक गोडसे

पण यांना सर्रास परवानगी असते का?

अधिकृत परवानगी सध्यातरी मिळत नाही. १५ जानेवरी २०१६ ला सरकारचे सुरक्षेच्या दॄष्टिने ड्रोन संबंधीत धोरण जाहीर होइल.
गाडीच्या लायसन्स सारखे ड्रोनला लायसन्स मिळाले पाहीजे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भागात संबंधीत पोलिस स्टेशनची परवानगी घ्यावी लागली तर अडचणीचे ठरेल.

गुप्तहेरगिरीसाठी वगैरे फारच सोयोस्कर प्रकरण दिसते आहे.

दुर्देवाने हे सहज शक्य आहे. ड्रोन उडवायला सरकारने बंदी घालायचे ठरवीले तरी हे तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की त्यावर देखरेख करणे सोपे नाही.

सिरुसेरि's picture

12 Jan 2016 - 12:36 pm | सिरुसेरि

सर्वांचे अभिनंदन .

भिंगरी's picture

12 Jan 2016 - 2:01 pm | भिंगरी

विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

पॉइंट ब्लँक's picture

12 Jan 2016 - 2:59 pm | पॉइंट ब्लँक

"क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती " हा फोटो प्रचंड आवडला. त्याला पहिल्या तीन मध्ये जागा मिळायला पाहिजी होती. कुणी काढला आहे कळेल का?

साहित्य संपादक's picture

12 Jan 2016 - 3:38 pm | साहित्य संपादक

क्र.१ पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. - मिनियन
क्र. ३ रत्नागिरी मधील पारंपारीक शेती - नन्दादीप
क्र. ४ इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु - कविता१९७८

क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग - त्रिवेणी
क्र. ८ सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना - संजय पाटिल

क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती - श्रीरंग_जोशी
क्र. १० भात-लावणी/ पेरणी - अजिंक्य विश्वास

क्र. ११ पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती - मोहन

क्र. १२ डहाणू येथील एक आंब्याची बाग - माम्लेदारचा पन्खा

क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती - प्रीत-मोहर
क्र. १४ महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत - सर्वसाक्षी
क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. - मी_देव

स्पर्धेची नवी पद्धत आवडल्याचे कळविल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या व इतर स्पर्धांच्या आयोजनाबद्दल आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल.

- साहित्य संपादक

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार.

जबरी छायाचित्रे ! विजेत्यांचे अभिनंदन !

खेडूत's picture

12 Jan 2016 - 4:56 pm | खेडूत

छान!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन- सहभाग घेणार्या सर्वांचे आभार...

कपिलमुनी's picture

13 Jan 2016 - 5:40 pm | कपिलमुनी

सर्व सहबागी आणी विजेत्यांचे अभिनंदन

....... मनःपूर्वक अभिनंदन !

इन कम's picture

13 Jan 2016 - 9:22 pm | इन कम

विजेत्यांचे अभिनंदन !!

श्रीरंग_जोशी's picture

14 Jan 2016 - 11:12 pm | श्रीरंग_जोशी

१) छायाचित्रणकला स्पर्धेचा हा १५ भाग, अन मोजून १५ प्रवेशिका होत्या.
२) मतदानाचा धागा प्रकाशित झाला ती तारीख भारतीय प्रमाण वेळेनुसार Fri, 01/01/2016 - 00:00.