घोस्टहंटर-३

Primary tabs

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
18 Dec 2015 - 10:04 pm

१६६५!
इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले!
काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता!
ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता!
मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती!
आंद्रे!!!!!
"ब्रॅक्स्टन!"
"कोण?"
"मी लाओ!"
लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता.
"बोल लाओ."
"ईशान्येला सैन्य हलवा!"
ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही!
ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला!
आणि लाओने पहिला जीव घेतला. ईशान्येकडील रखवालदारचा!
नेवर बिलिव बिट्रयल!
ब्रॅक्स्टनने तांडव सुरू केले होते. गढीत रक्ताची होळी सुरू झाली. समोर जो येईल त्याला ब्रॅक्स्टन कापत होता. स्पॅनिश सैन्य हतबल झाले होते.
लांडगा रक्ताला चटवला होता!
मात्र त्याची लढाई अजूनही वाघाबरोबर व्हायची होती!
आंद्रे!!!!!!
तो समोर आला होता!
सात फूट उंच. अत्यंत भारदस्त शरीर. गुढग्यापर्यंत पोहोचणारे हात आणि दोन्ही हातात परशु. सिंहाच्या कातडीचे चिलखत, आणि चेहऱ्यावर सोन्याचे शिरस्त्राण!
आंद्रेने कत्तलखाना चालू केला!
तो स्वतःभोवती गोल फिरत होता. त्याचे बाहु पसरले होते आणि त्याच्या परशुने सैनिकांच्या चिंध्या उडत होत्या!
ब्रॅक्स्टन हतबल झाला होता. त्याच्यासमोर साक्षात म्रुत्यू तांडव करत होता!
लाओ मात्र वेगळ्याच विचारात होता.
"ब्रॅक्स्टन!" लाओ ओरडला
ब्रॅक्स्टनने त्याकडे पहिले!
लाओने मानेवर हात फिरवला. ब्रॅक्स्टनने आंद्रेचे निरीक्षण करायला सुरुवात केली.
त्याच्या मानेवर काळा व्रण होता.
तॉलाचा शाप!
ब्रॅक्स्टन आनंदाने बेहोश होण्याची पाळी आली. आणि पुढच्याच क्षणी त्याने आपल्या शरीरात तलवार खुपसली!
रक्त!
ब्रॅक्स्टनने क्षणात ते रक्त चाटले आणि ती तलवार आंद्रेकडे फेकली!
तलवार बरोबर मानेवर व्रण होता तिथे जाऊन खुपसली!
आणि आंद्रे खाली कोसळला........!
स्पेनच्या गढीत इंग्रज विजयी झाले.
मात्र तेव्हाच एक विलक्षण घटना घडून आली!
तिच्यासारखी सुंदर स्त्री आजपर्यंत इंग्रज सैन्याने बघितली नव्हती!
अन्ड्रिआ!!!!
आंद्रेची मुलगी!
ती सैनिकांकडे बघून हसली!
आणि पुढच्याच क्षणी तिची राख झाली!
इंग्रज सैन्य लंडनकडे कूच करत होते. विजयाने ते अक्षरशः वेडे झाले होते. आणि आणखी एका दुसऱ्या गोष्टीमुळे देखील!
त्यांच्या स्वप्नात एक परी येत होती!
त्या परीच्या विरहात ते झुरत होते, तिला भेटण्यासाठी कायम झोपून रहात होते. आणि झोपेतच मरत होते!
तेरा हजार सैनिक स्वप्नातच रहात होते. स्वप्नातच झुरत होते!
.......स्वप्नातच मरत होते!

क्वीन अन्ड्रिआ!
क्वीन ऑफ़ सुक्कुब्बुस!!!!!!!!!

क्रमश:

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाव्युत्पत्तीसाहित्यिकप्रकटनविचारआस्वादलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

18 Dec 2015 - 10:05 pm | DEADPOOL

घोस्टहंटर-३

DEADPOOL's picture

18 Dec 2015 - 10:05 pm | DEADPOOL

घोस्टहंटर-२

अद्द्या's picture

18 Dec 2015 - 10:07 pm | अद्द्या

कमीत कमी एकदा स्क्रोल करावा लागू दे . एवढा तरी मोठा लिहा.

पद्मावति's picture

18 Dec 2015 - 11:04 pm | पद्मावति

फारच इण्टरेस्टिंग. पु.भा.प्र.

DEADPOOL's picture

19 Dec 2015 - 8:04 am | DEADPOOL

धँस

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2015 - 11:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वाटलेलचं सक्कुबस असणार म्हणुन =))

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 11:14 pm | एक एकटा एकटाच

म्हणजे???????

DEADPOOL's picture

19 Dec 2015 - 7:57 am | DEADPOOL

गपा आता

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Dec 2015 - 8:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेहेहेहे!! नाही उघडं करत हो काही चिंता नको =))

DEADPOOL's picture

19 Dec 2015 - 8:11 am | DEADPOOL

ऑलरेडी केलय मी!
क्वीन ऑफ़ सुकुब्बुस!!!!
शेवटची ओळ!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Dec 2015 - 8:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यापुढचं कै सांगत नाही =))

DEADPOOL's picture

19 Dec 2015 - 8:19 am | DEADPOOL

ओक्क्क्के!

विशाल कुलकर्णी's picture

19 Dec 2015 - 10:08 am | विशाल कुलकर्णी

जरा मोठे मोठे भाग लिहा की राव ...
वाचतोय !

DEADPOOL's picture

19 Dec 2015 - 2:58 pm | DEADPOOL