छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
16 Dec 2015 - 8:29 am

नमस्कार मंडळी,

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत.

मिपाकरांनी सुचवल्यानुसार यंदा स्पर्धकांचे नाव प्रवेशिकेबरोबर न लिहिता मतदानाचा धागा प्रकाशित करायचे आम्ही ठरवले आहे. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३० डिसेंबर. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.

दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता.

स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहे.

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे

मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतु ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक
व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय

टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

कलासद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

वा! खूपच वेगळा विषय आहे. आपला कंफर्ट झोन सोडून विचार करण्यास छायाचित्रकारांना भाग पडेल अशी आशा.

वा! खूपच वेगळा विषय आहे. आपला कंफर्ट झोन सोडून विचार करण्यास छायाचित्रकारांना भाग पडेल अशी आशा.

कपिलमुनी's picture

16 Dec 2015 - 11:50 am | कपिलमुनी

कृषी म्हणजे शेती विषयक म्हणजे शेतीची मशागत करतानाची ईई छायाचित्रे चालतील का ? की केवळ पिकांचीच हवी आहेत याचा खुलासा / विवेचन / डिटेल्स अपेक्षित

साहित्य संपादक's picture

16 Dec 2015 - 5:23 pm | साहित्य संपादक

प्रत्यक्ष शेतातली किंवा फळबागेतली कुठल्याही प्रक्रियेची छायाचित्रे चालतील.

जागु's picture

16 Dec 2015 - 12:05 pm | जागु

वा जिव्हाळ्याचा विषय.

पेण येथिल तांदळाची शेती.

साहित्य संपादक आयडीला व्यनि करून पाठव स्पर्धेचा फोटो.

असंका's picture

17 Dec 2015 - 12:02 pm | असंका

मंजे जे छायाचित्र इथे सदस्यनामासह प्रकाशित होतंय ते आपोआप 'स्पर्धेसाठी नाही'/'बाद झालं' असं समजायचं का?

पैसा's picture

17 Dec 2015 - 2:52 pm | पैसा

संपूर्ण गुप्त मतदान व्हावे असा प्रयत्न आहे, म्हणून प्रवेशिका सा सं आयडीला व्यनि करून पाठवा असे लिहिले आहे ना.

सा सं प्रवेशिका पोहोचल्याची पोच - पावती देतील का?

साहित्य संपादक's picture

18 Dec 2015 - 12:18 pm | साहित्य संपादक

हो, आता पर्यंत मिळालेल्या प्रवेशिकांना पोचपावती देण्यात आली आहे.

साहित्य संपादक's picture

31 Dec 2015 - 10:35 am | साहित्य संपादक

श्रावणात कोकणात भटकंती करत असताना..

EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400
Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm

महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत

कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती

Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0;
Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7
Flash not used

डहाणू येथील एक आंब्याची बाग

या बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात.

पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती

भात-लावणी/ पेरणी

डिटेल्स:
कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्‌.एम्‌ लेन्स टॅमेरॉन; आय्‌.एस्‌. ओ. - १००
एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी
पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग
स्थळ- सिंहगड पायथा

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती

सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना

कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र

राजुरी येथील द्राक्षबाग

कॅमेरा - सॅमसंग e७

मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४)

EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm

इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु

रत्नागिरी मधील पारंपारीक शेती

तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी.

EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter
Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix

पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य.

कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे.

टीपः चित्रे मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करावे.

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 9:24 am | प्रचेतस

छायाचित्रे आवडली.
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले तर एकदम सुपर्ब.

असंका's picture

26 Dec 2015 - 12:16 pm | असंका

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले तर एकदम सुपर्ब.

+१

रंगीबेरंगी झेंडुची शेती आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2015 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चित्रे !

चित्रांना क्रमांक दिले तर मतदान करणे जास्त सुलभ होईल.

साहित्य संपादक's picture

26 Dec 2015 - 8:45 pm | साहित्य संपादक

चित्रांना क्रमांक मतदानाच्या धाग्यात देण्याची योजना आहे. त्या धाग्यातला अनुक्रम वेगळा असू शकतो.

साहित्य संपादक's picture

29 Dec 2015 - 10:29 am | साहित्य संपादक

प्रवेशिका पाठवण्याची मुदत उद्या संपत आहे. इच्छुकांनी कृपया नोंद घ्यावी.

प्रीत-मोहर's picture

29 Dec 2015 - 10:56 am | प्रीत-मोहर

चित्र क्र. २, ५ आणि ८ खूप आवडली

कविता१९७८'s picture

29 Dec 2015 - 10:56 pm | कविता१९७८

ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर कॅम्पस , हैदराबाद, पाटणचेरु

कविता१९७८'s picture

29 Dec 2015 - 10:58 pm | कविता१९७८

ईंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर कॅम्पस , हैदराबाद, पाटणचेरु

.

प्रीत-मोहर's picture

30 Dec 2015 - 10:26 am | प्रीत-मोहर

आपले फायनल वोट फोटो क्रमांक ९!!!!! इतका अप्रतिम फोटो आहे!!!!

खेडूत's picture

30 Dec 2015 - 10:50 am | खेडूत

सुंदर चित्रे आणि आयोजन...!

फोटो नं. १० कर्नाटक मद्दुर येथिल भातशेति छान फोटो आहे. आभाळाचा रंग व शेतिचा रंग काय जुळ्लाय.

मि एक फोटो पाठ्वला आहे, अगदि शेवटच्या सेकंदाला. पोचला का? कळ्त नाहिए.