कोरोना विरूध्द भारताचा लढा

घोस्टहंटर-२

Primary tabs

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
18 Dec 2015 - 2:49 pm

बावीस दिवसांपूर्वी!
एक तरुण रस्त्याने जात होता. त्याच्या शरीरावर अत्यंत उंची वस्त्रे होती.त्याने रस्त्यावरील एका टॅक्सीला हात दिला.
"मेरीओ हॉटेल!"
भरधाव वेगाने टॅक्सी निघाली.
मेरीओ हॉटेल ही लंडनमधील अत्यंत उंची हॉटेल म्हणून गणली जात असे. अनेक अभिनेते,उद्योजक,नेते,या हॉटेलमध्ये विचारविनिमय करत असत.जगातल्या सर्व सुखसोयी या हॉटेलमध्ये होत्या.
"हॅलो मि. ग्रेग!" तो तरुण म्हणाला.
ग्रेगने मान हलविली!
"मी काउंट मॉर्सेलिस. माफ करा मला थोडा उशीर झाला."
"इट्स ओके!" ग्रेग हसत म्हणाला.
कॉफी विदाऊट शुगर! मॉर्सेलिसने ऑर्डर दिली!
"तर मी आता मुद्यावर येतो. सर्वप्रथम मला आपली ओळख करून द्यायला हवी. माझे नाव आपल्याला माहितच आहे. हॅम्पशायरला माझी पिढीजात हवेली आहे. ह्या हवेलीत सध्या आमची मॉर्सेलिस परिवाराची तेरावी पीढ़ी राहत आहे.
आजपर्यंत आमचे आयुष्य सुखाने चालू होते. परंतु काही घटनांनी आमचे आयुष्यच हादरून टाकले आहे."
"आपण मला जरा नीट सांगा!" ग्रेग म्हणाला.
"महिन्याभरापुर्वी माझ्या लहान भावाचा झोपेत म्रुत्यू झाला. डॉक्टरना यात काहीच अनैसर्गिक वाटले नाही. पण यात एक गोम होती."
काय? ग्रेग आश्चर्यचकित होत म्हणाला.
"मरण्याआधी चार दिवस तो सलग झोपला होता.फक्त जेवणासाठी तो उठत असे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तो झोपेत असे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंद दिसे. कोणीही त्याला उठवायला गेले तर तो भयंकर चिडत असे."
"पुढे?"ग्रेगला आता रस येत होता.
"मात्र म्रुत्यूच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत वेदना होत्या. असा भयंकर चेहरा मी अजून बघितला नव्हता."
"मग तुम्ही मला तेव्हाच का नाही बोलावले?" ग्रेग म्हणाला.
"कारण तेव्हा मला यामागील कारण समजले नव्हते!"मॉर्सेलिसने उद्गार काढले
"आणि आता?" ग्रेगने विचारले.
मॉर्सेलिसने एक पुडके ग्रेगपुढे टाकले.
"तुम्ही आजपर्यंत किती केस सोडवल्या आहेत?" मॉर्सेलिसने विचारले!
"दोनशे तेरा!" ग्रेग अभिमानाने म्हणाला.
"आणि तिने तेरा हजार जीव घेतलेत, आणि अशा रितीने ज्याचा तुम्ही विचारसुद्धा करु शकत नाही!" मॉर्सेलिस म्हणाला आणि तडक बाहेर पडला!
ग्रेग त्याच्याकडे बघतच राहिला!

हे ठिकाणमांडणीवावरसंस्कृतीनाट्यवाङ्मयकथा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 2:54 pm | एक एकटा एकटाच

चांगलीय

पण थोडे मोठे मोठे भाग टाकाना

फारच लहान होताहेत भाग

लिंक तुटतेय

उगी हग्ल्यासारखे करू नका... मोठे भाग टाका

- संतृप्त टमरेलात्मा

दोन्हीही भाग वाचले. खूप मस्तं आहेत.
पुढच्या वेळी जरा मोठे भाग टाकले तर लिंक तूटल्यासारखी वाटणार नाही. पु.भा.प्र.

पैलवान's picture

18 Dec 2015 - 4:31 pm | पैलवान

तोवर ती संपतेपण...

नाखु's picture

18 Dec 2015 - 6:09 pm | नाखु

बोब्र आहे..

बुवा का दिसेनात धाग्यावर ????

लंडन मध्ये "without sugar" ओर्डर द्यायला लागत नाही. तिथे without शुगरच मिळते. विशेषकरून महागड्या हॉटेल्स मध्ये.
हि अशी ओर्डर आपल्याला भारतात शिवसागर type हॉटेल्स मध्ये द्यायला लागते

उगाच मधुमेह झाल्यासारखे वागू नका.

DEADPOOL's picture

18 Dec 2015 - 5:41 pm | DEADPOOL

धँस मंडळी!

उगा काहितरीच's picture

18 Dec 2015 - 6:55 pm | उगा काहितरीच

वाचतो आहे..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2015 - 7:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सक्कुबस कै ओ =))

DEADPOOL's picture

18 Dec 2015 - 8:33 pm | DEADPOOL

गपा आता ;)