दाराआडची मुलगी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 9:47 pm

एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार
जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही तिचा विचार?
जात असेल का तो ही
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे?
मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते,
ते डोळे डोळ्यात घेऊन
मुलगा शांतपणे जागा राहतो....
डोळे हरवलेली मुलगी
घर नसलेल्या दाराआडून बघत राहते...
बघतच राहते....

-शिवकन्या

कविता माझीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

3 Apr 2019 - 10:56 pm | तुषार काळभोर

काहीतरी गहन अर्थ आहे.

धन्यवाद. गहन अर्थ लावू पाहताय....

सोन्या बागलाणकर's picture

4 Apr 2019 - 4:42 am | सोन्या बागलाणकर

गूढ गहन! एखाद्या कोड्यासारखी कविता.
आवडली.

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 8:40 am | शिव कन्या

सगळे डोळे तसे कोडेच .... धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Apr 2019 - 9:48 am | ज्ञानोबाचे पैजार

ही कविता त्या चर्चिलचा सिगार आणि व्हिस्की बॉटल च्या कोड्या सारखी आहे.
पैजारबुवा,

अन्या बुद्धे's picture

4 Apr 2019 - 10:47 am | अन्या बुद्धे

छान!

अभ्या..'s picture

4 Apr 2019 - 11:52 am | अभ्या..

माझ्याच डोळ्यांनी वाचली कविता
भिंतीला दरवाजा नव्हता
पाठवलेल्या डोळ्यांनी वाचली कविता
दरवाज्याला भिंती नव्हत्या.
.
मस्त

तुषार काळभोर's picture

4 Apr 2019 - 12:27 pm | तुषार काळभोर

आरं ते काय कमी गहन आहे का... तू अजून क्रिप्टीक केलंस!

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 9:28 pm | शिव कन्या

जाणत्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

तिमा's picture

4 Apr 2019 - 1:41 pm | तिमा

मी डोलेकर, डोलेकर, डोलेकर दर्याचा राजा!

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2019 - 3:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुलगी कुठे बसलेय? कोकणात? मुंबईत?
मुलगा कुठे बसलाय? दुबईत? साउथ आफ्रिकेत?मादागास्कर मध्ये?
मुलगी दाराबाहेर का येउ शकत नाही? दाराला घर नाही म्हणजे काय? डोळे पाठविले म्हणजे काय?

निस्ता राडाsssss

न समजलेल्या प्रामाणिकांनीनी इकडे रांग लावावी.

अर्थाबद्दल काही हताश अंदाज:

-नेत्रदान श्रेष्ठ दान

-स्त्रीवरील बंधने

-क्रूझ शिप कंपनी

-कोडाईकॅनालचे भूछत्र

-कॅनाबीज कायदेशीर करा आंदोलन

-कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले स्वप्नातील टुमदार घर (स्वतंत्र सातबारा व N/A प्लॉट्स)

की आणखी काही?

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2019 - 4:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

नाणार प्रकल्पाला विरोध
कोकणात किनार्‍यावर शॅक्स लावायला परवानगी
सी आर झेड कायद्याचे उल्लंघन

गवि's picture

4 Apr 2019 - 4:07 pm | गवि

अय्यो रामा.

खरंच की. या बाजू कशा निसटल्या .. ?

गामा पैलवान's picture

5 Apr 2019 - 1:35 am | गामा पैलवान

गवि,

उगाच गुंतागुंत वाढत्येय. ही एकदम सोप्पी कविता आहे. सार्वजनिक संडासात बसून मोबाईलवर च्याटिंग केलेलं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : मुलगा मात्र उघड्यावर बसलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2019 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>कोंकणात समुद्रकिनाऱ्यावर आपले...

मलाही असंच वाटतं. समुद्रकिना-यावर वाळूत एक खोपा असावा. तो असावा, मग सोबत ''हम तूम बने एक दूजे के लीये'' गाणं असावं. किराणा आणायला तो गेलेला असल्यामुळे मुलगी बंद दाराआड़ून त्याची वाट पाहते, खूप सुंदर कल्पना आहे.

-दिलीप बिरुटे
(बंद दाराआड तांदूळ निसायला घेतलेला)

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 9:29 pm | शिव कन्या

:)))

प्रचेतस's picture

4 Apr 2019 - 4:41 pm | प्रचेतस

क्रिप्टिक.
कोडं सुटता सुटता परत नव्या कोड्यात अडकतंच जावं अशी.

गहन वाटतेय , शक्य झाल्यास आपल्याला असलेला अर्थ व्यनि केला तर फार उपकार होतील .. आणि बाकीची इडंबने बघितली त्यामुळे माझेही हात जरा शिवशिवू लागले आहेत .. आधीच माफी मागून ठेवतो .. धन्यवाद

जव्हेरगंज's picture

4 Apr 2019 - 7:37 pm | जव्हेरगंज

liked.

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 9:35 pm | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.
अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात...
सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 9:35 pm | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.
अर्थ उकलीचे अनेक प्रयत्न चालू .... चालू द्यात...
सर्व विडंबनकारांचे आभार. कविता गहन असली तरी पोहोचली, छान वाटले.

चांदणे संदीप's picture

5 Apr 2019 - 12:31 am | चांदणे संदीप

सर्व विडंबने वाचली सर्वच्या सर्व आवडली.

कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं.

Sandy

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 5:21 pm | चौथा कोनाडा

कच्चा माल जितका चोख तितकी त्याची उत्पादनं दर्जेदार हेच यावरून सिद्ध होतं.
+१, चांदणे संदीप

अनेकांना आपाअपल्या कल्पना मांडण्यासा ठी स्फुर्ती देणारी प्रेरक कविता !

काही गहन अर्थ असावा, असे वाटायला लावणारी कविता आवडली.
अनेकांना या कवितेने प्रेरणा देऊन काहीतरी निर्मिती करायला लावली, हे विशेष.
कवियत्रीने कवितेचा एक सुंदर घाट इथे निर्मिला आहे, त्या घाटावर येऊन काव्यगंगेत डुबकी मारण्यात एक आगळीच मौज आहे. 'शिव कन्या' यांना अनेक धन्यवाद.

शिवकन्या, सुरेख लिहिता तुम्ही.

शिव कन्या's picture

19 Apr 2019 - 6:31 am | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.

भलेबुरे विडंबन पाडणार्यांचेही आभार.

तुषार काळभोर's picture

19 Apr 2019 - 12:30 pm | तुषार काळभोर

ते ठीके, पण अर्थ सांगा की!