तू पहाट ओली
सांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन
उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून
पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा
ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा
झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली
विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.com
ही कविता आवडली.
ही कविता आवडली.
कविता आणि हिरवीण (ती कोण आहे
नाव आहे की चित्रात, रेजिना
धन्यवाद. मला वाटले होते ते
शीर्षक वाचून भलतेच काही मनात
(No subject)
ही कविता आवडली.