Skip to main content

टका उवाच

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

(गफ)

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 27/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

ती पहाट ओली(झालेली! ;) )

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 17/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकले

(धुतले...)

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 02/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

(एक ग्लास त्याचा....)

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 17/04/2017 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार...

बंद पडलं..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/06/2016 या दिवशी प्रकाशित केले.
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

आमचे आगोबा [मिपाक्विता]

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 19/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

(कूणास ठाऊक ?)

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 18/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)