< वाटतं असं …. की >
अतृप्त यांच्या वाटतं असं… की ह्या सुंदर कवितेचे वाईट विडंबन करीत असल्याबद्दल अतृप्त आणि सर्व थोरा मोठ्यांची क्षमा मागते.
वाटतं असं… की
तुझ्या घोरण्याचे सगळे नमुने रेकॉर्ड करून ठेवावे,
आणि एक दिवस तू झोपल्यावर ते चालू करावे,
नक्की माझी झोपमोड करणारा खर्ज कुठला ते शोधण्यासाठी!
वाटतं असं… की
तुझे मळलेले सगळे मोजे गोळा करून तुलाच धुवायला लावावे,
तू बूट काढल्यावर पसरणारा दुर्गंध,
तुला कळण्यासाठी
वाटतं असं… की
तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा,
भावना आणि यंत्र यातला फरक,
तुला समजण्यासाठी