कोविड-कोविड गोविंद गोविंद
आली एकादशी
ग्रासे जरी कोविड
मुखी तरी गोविंद
वारकरी
हाती ग्लोव्हज्
मुखी मास्क
एकची टास्क
नाचूरंगी
सॅनीटाझर ची उधळण
वैष्णवां ना ताप
डोळ्यांपुढे बाप
पांडूरंग
कसले हे वर्ष
यंदा नाही वारी
तूच देवा तारी
भक्तजना
एकमेका आता
नाही लोटांगणे
उभी घटींगणे
पोलीस ते
युगे चार मास
राबताती अथक
सफाई मदतनीस
डाॅक्टर,नर्स,पोलीस
रात्रंदिस
तुझ्यात पांडूरंग
म्हणोनी वारकरी
पोलीस पाय धरी
होत धन्य