गती
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते.
काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही.