✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Sat, 05/30/2015 - 14:37  ·  लेख
लेख
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला. सिग्नलला थेट मामाशेजारी उभं राहुन त्यांना फोन केला तर ते वल्लींची वाट पाहत रस्त्यावर उभे होते आणि वल्लींनी "अग्दी पाच मिंटात येतो बर्का असं अर्ध्या तासापुर्वी बोलल्याचं शुभवृत्तांत कळला". ;).. तो फोन संपवुन थोडा पुढे जातोय तोपर्यंत Gogglya उर्फ नितीनचा फोन आला. तो अगदी वेळेआधी १५ मिनीटं गणेशतलावापाशी जाउन उभा होता. शिका रे कैतरी नव्या आयडींकडुन. असो. पुढच्या १० मिनिटात मीसुद्धा गणेश तलावापाशी पोचलो. मंडळी कुठेही दिसेनात म्हणुन मी जरा तलावाच्या बाजुच्या रस्त्याला गाडी दिसली तर मुवि त्यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर बसताना दिसले. त्यांना हात केला. तिथेचं झकासरावही भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाचं मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो ह्याचा फोन आला. त्याला पत्त्याला लाउन आम्ही बागेकडे जायला निघालो. (ह्या लोकांनी आणि पहिला राजा ह्या आयडीने बागेबाहेर बराचं उद्योग केल्याचं लक्षात आलं. बागेजवळ बसलेल्या चार टाळक्यांना त्यांनी "मिसळपाव?" असा प्रश्ण टाकला आणि त्या टाळक्यांनी पण "नाssSssSsही, वडापाव" असं उत्तर देउन गार केलं. दोनदा झालं हो असं. शेवटी ती पोरं येईल त्याला वडापाव असा आवाज द्यायला लागली असं ऐकुन आहे. ;) ;) ) मग आम्ही सगळ्यांनी बागेकडे कुच केलं. लांबुनचं बागेच्या पोडियम वर थांबलेले वल्लीबुवा दिसले (वल्लीबुवा-वल्ली आणि बुवा नव्हे). गाड्या लाउन मुविंबरोबर पोडियमवर पोचलो. तिकडे मितान तै, त्रि-----------------वे--------------णी तै (एखादा स्पेस कमी पडला असेल तर माफ करा हो), सौ. मुवि आणि अजुन एक तै होत्या (सॉरी, मला नावं नीट ऐकु आलं नाही. धाग्यामधे अपडेट कराल का? :( ). सौ. मुविंनी चविष्ट चिरोटे देउन सगळ्यांचं स्वागत केलं. इकडे अन-अनाहितामधले वल्ली, नितीन पाटील उर्फ gogglya, नाखु'न'काका, एक्काकाका, चौ.रा.काका, पहिला राजा इ.इ. मंडळींनी स्वागत केलं. नितीननी सगळ्यांना कॅटबर्‍या दिल्या आणि चौराकाकांनी पेढे वाटले. मग ओळखपरेडीचा कार्यक्रम चालु झाला. सगळ्यांची नावं कळली. (त्या एका तैंच नाव नीट ऐकु आलं नाही आणि काहितरी वैचारिक उपद्व्याप करायच्या नादामधे मी विचारायचं राहुन गेलं). तेवढ्यात गणेशा कंपनीला टँजेंट हाणुन कट्ट्याला आले. आणि गप्पा-टप्पांना सुरुवात झाली. हे होतयं न होतय तोपर्यंत आत्मुस बुवांचा (फेमस कथानायकाचे साहित्तीक निर्माते, दिगदर्शक, उत्तम लेखक, फुलराणीप्रेमी, जिलबीसंप्रदायाचे स्थापनकर्ते ई.ई.) फोन आला आणि येतोय असं कळवलं. ते येताहेत हे कळल्यावर मंडळींचे चेहेरे आनंदाने उजळले. =)). कपिलचाही फोन आला. तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =)) थोडा वेळ बाहेर उखाळ्या-पाखाळ्या काढुन, नं आलेल्या आयडींना उचक्या लावण्यामधे मंडळी गुंतली. (अन्या दातार, कालच्या तुला लागलेल्या उचक्यांना संपुर्णपणे नाखुनकाका जबाबदार आहेत रे). दंबुकवाले डॉक का आले नसावेत ह्यावरुन बराचं खल झाला आणि एक्काकाकांनी ते प्रॅक्टीसमधे गुंतलेले असल्याने आले नसावेत असा अंदाज व्यक्त केला. (पेशंट प्रॅक्टिस का टारगेट शुटिंग प्रॅक्टीस ही अंमळ शंका आहे) ;). तेवढ्यात दाढीधारी औरंगजेबाचं सपत्नीक आगमन झालं. त्याच्या पाठोपाठ कपिलही आला. मग सगळ्यांनी बागेमधे कुच केलं. अंधार व्हायला लागलेला होता. मंडळींनी इथे माझी खेचायचा माफक अतिअयशस्वी प्रयत्न करुन पाहिला =)). नाखुनकाकांना चौथा कोनाडा ह्या सखोल आयडीचा फोन आला आणि परत त्यांना आणायसाठी म्हणून आम्ही बागेबाहेर आलो. चौथा कोनाडाही सपत्नीक आलेले होते. एवढी हसत खिदळत चाललेली मंडळी बघुन बागेच्या गार्डांची पाचावर धारण बसली असावी असा अंदाज आहे. सगळेजण सावरकर उद्यानामधल्या धबधबा चौथर्‍यावर जमले. चिरोट्यांचा राउंड टु झाला. तिकडे परत गप्पांचा राउंड टु सुरु झाला. तिकडे जेमतेम १० मिनिट होतायत तोपर्यंत बुवांचा फोन आला. त्यांनाही बागेपाशी बोलावलं. त्यांना घ्यायला म्हणुन मी परत बागेच्या दाराशी गेलो. (अश्या फेर्‍या रोज मारल्या असत्या तर काठीसारखा बारिक झालो असतो. असो). बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. त्यांना घेउन परत धबधब्यापाशी गेलो. जाता जाता गेल्या चार दिवसात त्यांच्यावर झालेल्या खरडहल्ल्याविषयी माफक चर्चा केली. बुवांनी दुर्लक्ष करणे (उर्फ फाट्यावर मारणे) ह्या हत्याराचे उपयोग समजाउन सांगितले. धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली. बुवा अजुनही फुलराणी कोण हे सांगायला तयार नाहित असं एक निरि़क्षण नोंदवतो. आता उशिर झाल्याने जेवायला जायचा बुट काढला गेला. कुठे जायचं ह्यावरुन चार-सहा हॉटेलांची नावं चावली गेली. शेवटी रसोई से फायनल करुन मंडळी बागेबाहेर यायला निघाली. सिक्युरिटी गार्डाच्या बाहेर पडाच्या शिट्ट्यांना चक्क फाट्यावर मारुन मंडळी रमतगमत बाहेर आली. बाहेर पार्किंग मधे पण परत थोडा वेळ कट्टा रंगला. आणि मंडळी जेवायला रवाना झाली. मी, कपिल आणि नितीन जेवायला जाणार नसल्याने बागेबाहेर आलो. कपिलही गेला. मग नितीनशी थोडा वेळ गप्पा हाणुन आम्ही आपापल्या घराकडे रवाना झालो. कोणाचा गफलतीनी नामोल्लेख राहिला असेल तर सांगा रे. (जेवण वृत्तांत लिहा रे कोणीतरी.) a डावीकडुन नितीन पाटील (gogglya), इस्पिकचा एक्का, झकासराव, उत्सवमुर्ती मुवि, चौरा, पहिला राजा, वल्ली, नाखु आणि मुवि ज्युनिअर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
55909 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

http://www.misalpav.com

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 14:48 नवीन
http://www.misalpav.com/comment/701057#comment-701057 हे कधी झाले मग? आणि सोवळ्यातला कट्टा शेप्रेट झाला कै?
  • Log in or register to post comments

बाकी कट्टा आज अस्ता तर यायचा

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 14:50 नवीन
बाकी कट्टा आज अस्ता तर यायचा विचार चाल्लेला ;)
  • Log in or register to post comments

एवढाच वृ आणि एकच फोटो? भर

अजया
Sat, 05/30/2015 - 15:09 नवीन
एवढाच वृ आणि एकच फोटो? भर घाला कट्टा उपस्थितांनो!
  • Log in or register to post comments

मझा रुमाल टाकुन जाते.

त्रिवेणी
Sat, 05/30/2015 - 15:37 नवीन
मझा रुमाल टाकुन जाते. त्या एका तईन च नाव- मोनु(आम्हा सर्व शांत्-समंजस अनाहितांपैकी एक).
  • Log in or register to post comments

खिक्क -आम्हा सर्व शांत्-समंजस

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 15:55 नवीन
खिक्क - आम्हा सर्व शांत्-समंजस अनाहितांपैकी एक असे पेश्शल लिहावे लाग्ते वाट्टे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

कॅप्टन आधी..

नाखु
Sat, 05/30/2015 - 16:17 नवीन
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.
  • Log in or register to post comments

प्रत्येकावर १ लेख होउ शकेल

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 16:23 नवीन
प्रत्येकावर १ लेख होउ शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/30/2015 - 22:16 नवीन
चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ऐश केली आहे कि राव!

पॉइंट ब्लँक
Sat, 05/30/2015 - 16:35 नवीन
ऐश केली आहे कि राव!
  • Log in or register to post comments

वा वा वा

श्रीरंग_जोशी
Sat, 05/30/2015 - 17:43 नवीन
एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?
  • Log in or register to post comments

सगळीच ज्येष्ठ आहेत. :-D :-D .

लालगरूड
Sat, 05/30/2015 - 17:46 नवीन
सगळीच ज्येष्ठ आहेत. :-D :-D .
  • Log in or register to post comments

अतिशय वादग्रस्त वाक्य आहे हे

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 18:47 नवीन
अतिशय वादग्रस्त वाक्य आहे हे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

हो ना तु आला असतास तर जरा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/30/2015 - 18:54 नवीन
हो ना तु आला असतास तर जरा कट्ट्याच्या वयाचं अ‍ॅव्हरेज वाढवता आलं असतं ३०-४० नी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

खिक्क .. माझे वय 19

लालगरूड
Sat, 05/30/2015 - 23:16 नवीन
खिक्क .. माझे वय 19
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मग तुम्हीच ज्येष्ठ...इथे सगळे

टवाळ कार्टा
Sun, 05/31/2015 - 00:18 नवीन
मग तुम्हीच ज्येष्ठ...इथे सगळे १८ वाले आणि १६ वाल्या हैत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

पुणेकर १२ चे आणी पिंचीकर १४

यसवायजी
Sun, 05/31/2015 - 01:02 नवीन
पुणेकर १२ चे आणी पिंचीकर १४ चे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तरूणपणा ऊफाळून आलाय वाटत ;-)

लालगरूड
Sun, 05/31/2015 - 07:45 नवीन
तरूणपणा ऊफाळून आलाय वाटत ;-) ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आगं बया बया बया न आगं बाब्व्

भीडस्त
Sun, 05/31/2015 - 13:49 नवीन
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

टका ला मिपा तरूण सदस्याचा

लालगरूड
Sun, 05/31/2015 - 07:46 नवीन
टका ला मिपा तरूण सदस्याचा पुरस्कार द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@वल्ली धरलेणीकर >>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 18:05 नवीन
@वल्ली धरलेणीकर >>> Image removed. @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> Image removed. चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! Image removed. @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील Image removed. हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" Image removed. केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष Image removed. ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! Image removed. ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच Image removed.जाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे Image removed. "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. Image removed. चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. Image removed. मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. Image removed. Image removed. ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. Image removed. ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/
  • Log in or register to post comments

ह.बुव्याचा उपवृत्तांत जबरदस्त

प्रचेतस
Sat, 05/30/2015 - 18:24 नवीन
ह.बुव्याचा उपवृत्तांत जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 18:31 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

"ह." ही कोणती पदवी?

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 18:49 नवीन
"ह." ही कोणती पदवी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओळख पाहू. ;)

प्रचेतस
Sat, 05/30/2015 - 20:16 नवीन
ओळख पाहू. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ट क्या ओळखु नकोस! :-D

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 20:22 नवीन
ट क्या ओळखु नकोस! :-D तो सवयी प्रमाणे कट्ट्यावर बसून आपली(च) हाणामारी बघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमच्या मनात जे आहे ते माझ्या

प्रचेतस
Sat, 05/30/2015 - 20:23 नवीन
तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

माझ्या मनात काहीच नाही!

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 20:39 नवीन
माझ्या मनात काहीच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खरंच?

प्रचेतस
Sat, 05/30/2015 - 20:42 नवीन
खरंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नायतर काय, खोटच!!!??? :P

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 20:55 नवीन
नायतर काय, खोटच!!!??? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला ३ अक्षरी शब्द वाटतोय..

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 21:07 नवीन
मला ३ अक्षरी शब्द वाटतोय...तोच आहे कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो हो

पैसा
Sat, 05/30/2015 - 21:22 नवीन
हसरे बुवा! तुला काय वाटलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हो तेच तेच ;)

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 21:41 नवीन
हो तेच तेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@ हसरे बुवा!

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 21:52 नवीन
@ हसरे बुवा! तुला काय वाटल>> :-D अगदी बरोब्बर!!!! आगोबा "आले आले, हसरे बुवा..आले!" ,असेच अन्यत्र म्हणत असतो. :-D धन्यवाद पै तै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी नै ऐकले ते मागच्यावेळी

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 21:54 नवीन
मी नै ऐकले ते मागच्यावेळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो का?

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 22:06 नवीन
हो का? मग मनातल्या मनात जप कर की अत्ता! म्हणजे तुझं तुला कळेल,आणि समाधानही मिळेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सगा नव्हता का जोडीला? सगा आणि

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 18:48 नवीन
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/30/2015 - 18:54 नवीन
तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/30/2015 - 19:05 नवीन
@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

क लिवलय क लिवलय

श्रीरंग_जोशी
Sat, 05/30/2015 - 19:39 नवीन
सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तो तलवारीने वारा घालणारा

सूड
Mon, 06/01/2015 - 15:19 नवीन
तो तलवारीने वारा घालणारा स्मायली आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तो तलवारीने वारा घालणारा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/02/2015 - 01:26 नवीन
तो तलवारीने वारा घालणारा स्मायली आवडला. =)) तो शरणागतीचे पांढरे निशाण हालवत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मस्त आहेत दोन्ही वृ.

यशोधरा
Sat, 05/30/2015 - 18:51 नवीन
मस्त आहेत दोन्ही वृ.
  • Log in or register to post comments

बुवाश्टाईल वृत्तांत आवडल्या

अजया
Sat, 05/30/2015 - 19:00 नवीन
बुवाश्टाईल वृत्तांत आवडल्या गेला आहे!
  • Log in or register to post comments

दोन्ही व्रुत्तांत खूप छान...

खटपट्या
Sat, 05/30/2015 - 19:39 नवीन
दोन्ही व्रुत्तांत खूप छान...
  • Log in or register to post comments

आवरा रे कोणीतरी यांना!

भाते
Sat, 05/30/2015 - 20:14 नवीन
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत. ह. बुवांचा

अन्या दातार
Sat, 05/30/2015 - 21:24 नवीन
मस्त वृत्तांत. ह. बुवांचा उपवृत्तांतही नेहमीप्रमाणेच मस्त. बादवे माझाच्च फक्त गणेशा झालाय का फोटोच्या बाबतीत??
  • Log in or register to post comments

मुख्य आणि उपवृत्तांत दोन्हीं छान!!

जुइ
Sat, 05/30/2015 - 21:33 नवीन
तेवढे फटु अजून येऊद्या.
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/30/2015 - 22:17 नवीन
आवडला कट्टा वृत्तांत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/30/2015 - 23:28 नवीन
मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )... Image removed. . Image removed. . Image removed. . Image removed. . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला... Image removed. . Image removed. . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )... Image removed. . Image removed. . Image removed. . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते. Image removed. . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला अहेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर... Image removed. . Image removed. . Image removed. पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले... Image removed. . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले... Image removed. ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो... Image removed. . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे... Image removed. . Image removed. . Image removed. (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता... Image removed. . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले... Image removed. . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर... Image removed. . Image removed. . Image removed. . बुटीकचे मालक... Image removed. अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .
  • Log in or register to post comments

अरे! तुम्ही नादमध्ये गेला

आदूबाळ
Sat, 05/30/2015 - 23:39 नवीन
अरे! तुम्ही नादमध्ये गेला होतात का? मस्त दुकान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा