राहणी

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
27 Mar 2015 - 10:23 am

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.

जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

समाजजीवनमानतंत्रराहणीविचार

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 11:27 am

तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमत

एनआरआयची भारतभेट..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
18 Mar 2015 - 11:04 am

मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक.

लयास गेले कधीच ते -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
16 Mar 2015 - 9:00 am

लयास गेले कधीच ते
रामराज्य ह्या भूमीवरचे
आता इथल्या रामातही
काही उरला नाही राम ..

रावण पैदा झाले इथे
सीताही जिकडे तिकडे
वानरसेना बहुत जाहली
म्हणती न कुणि राम राम ..

संकटात जरि असते सीता
मदतीला कुणि धावत नाही
आता इथल्या सीतेलाही
शोधत नाही कुठला राम ..

महिमा कलीयुगाचा ऐसा
मिळून राहती रावण राम
सीता रडते धाय मोकलुन
झाले सगळे नमक हराम ..
.

भावकविताअद्भुतरसकविताराहणीराजकारण

वजन कमी करणारा आहार

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 8:48 pm

वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा.

समाजजीवनमानराहणीऔषधोपचारलेखअनुभवशिफारससल्ला

वरुणदेवाचे पहिले दर्शन.....

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 11:31 pm

परवा यावर्षी पहिल्यांदा वरुण देवाने दर्शन दिले. त्या आधी हि तो आला होता. पण का कुणास ठाऊक एखादा पोस्टमन जसा हळूच दरवाज्यातून पत्र टाकून दुसऱ्या घराकडे वळतो , तसाच तो आला आणि आपल्या जलधारांची छोटीशी पिशवी रिती करून गेला. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जाणवल कि काहीतरी वेगळ वाटतंय. जीवाची होणारी तगमग , अंगाची होणारी लाही लाही अचानक कमी झाली होती .हवेत एक प्रकारची प्रसन्नता आली होती. बाहेर येऊन बघतो तर सर्व अंगणभर पाणी !!!! म्हणतल हे केव्हा झालं ???? काही न कळवता ,काही संकेत न देता पाहुणा आला अन गेला ही !!!! असं का केल असावं त्याने ? त्याला मला भेटायची इच्छा नव्हती?

जीवनमानराहणीविचार

आयुर्वेद रुग्णालय सुरु करणे बाबत....

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in काथ्याकूट
28 Feb 2015 - 8:07 pm

पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे.

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 11:03 am

माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील .

-सौ स. श. रा. ( मराठी विकिपीडियातील संदेशात पूर्ण नाव होते पण येथे ते संक्षीप्त केले आहे.)

समाजजीवनमानराहणीसल्लामदत

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 1:52 pm

सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो

हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)

राहणीचौकशी

आणिक एक आरक्षण

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
11 Feb 2015 - 4:12 pm

दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी होती; 'शेअर टॅक्सी मधे पुढची पॅसेंजर सीट महिलांसाठी आरक्षित.' त्यावर अनेक प्रतिक्रिया होत्या. सामाजिक संस्था, प्रवासी संघटना, इत्यादींनी अगदी स्वागतार्ह निर्णय वगैरे संबोधून या गोष्टीचं कौतुक केलं होतं. ट्रेनचे डबे झाले, बसच्या सीट झाल्या आता टॅक्सीच्याहि सीट महिलांसाठी आरक्षित; किंवा राखीव.