प्रवास

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 5:03 am

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १४

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
8 Oct 2014 - 4:15 am

बर्फाच्या कडेने जात एका लहानशा खाडीत ग्जो ने प्रवेश केला. या खाडीच्या पलीकडे पश्चिमेच्या दिशेने जाणारा दुसरा जलमार्ग असल्याचं हॅन्सनला आढळलं होतं. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच बर्फाने वाट अडवली होती. अनेक लहान-लहान खाड्या हिमखंडाच्या आतपर्यंत शिरलेल्या आढळत होत्या. यापैकी एक खाडी हर्शेल बेटापासून पंधरा मैलांपर्यंत आत शिरली होती. ही खाडी आणि पश्चिमेचा जलमार्ग यात बर्फाचा लहानसा पट्टा होता, पण दुर्दैवाने हा बर्फ अद्यापही घट्ट होता. २४ जुलैच्या रात्री ११ वाजता ग्जो ने बर्फापुढे माघार घेतली आणि हर्शेल बेटाचा मार्ग धरला!

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
7 Oct 2014 - 9:23 am

३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली. तिथे आठवडाभर विश्रांती घेऊन अ‍ॅमंडसेनने पुढची वाट धरली आणि मजल - दरमजल करीत अखेर २८ फेब्रुवारीला अ‍ॅमंडसेन हर्शेल बेटावर येऊन पोहोचला!

प्रवासलेख

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Oct 2014 - 2:07 am

ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.

डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.

ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.

डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...

१. ठिकाण ===> नंदी पॅलेस

२. दिनांक ===> १८-१०-२०१४

३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०

४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.

डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १२

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
5 Oct 2014 - 11:20 pm

९ सप्टेंबरला हर्शेल बेटावरुन आलेला मिशनरी फ्रेझर याची अ‍ॅमंडसेन आणि स्टेन यांच्याशी गाठ पडली. फ्रेझर मॅकेंझी नदीवर असलेल्या फोर्ट मॅकफर्सन इथे निघाला होता. त्याच्या जोडीला रॉक्सी हा एस्कीमोदेखील होता. किंग पॉईंटच्या पश्चिमेला चार मैलांवर एका तंबूत त्यांनी मुक्काम ठोकला होता. हर्शेल बेटाच्या परिसरात पाच जहाजं बर्फात अडकून पडलेली होती. त्याचबरोबर किंग पॉईंटच्या पूर्वेला आणखीन सहा जहाजं अडकल्याचंही त्याच्याकडून स्टेनला कळून आलं. ही जहाजं नेमकी कोणत्या परिसरात आहेत याबद्दल मात्रं फ्रेझर अनभिज्ञ होता.

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
4 Oct 2014 - 7:17 am

केप कॉलबॉर्न इथे पोहोचल्यावर अ‍ॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला!

तो म्हणतो,
"इथून पुढे जाताना सतत पाण्याची खोली मोजण्याची आवश्यकता नव्हती! आमच्या जहाजापेक्षा कितीतरी मोठी जहाजं इथपर्यंत येऊन परत गेली होती! जॉन रे, कॉलीन्सन, मॅक्क्युलर आणि इतरांच्या मेहनतीतून तयार झालेले अनेक नकाशे आता आम्हाला उपलब्ध होते! अज्ञात सागरातून मार्ग काढण्याची यापुढे आवश्यकता नव्हती!"

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १०

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
3 Oct 2014 - 8:21 am

सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट आणि हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनच्या आसपास पंचवीस मैलांच्या परिसरात शिकारीसाठी तीन मोहीमा केल्या. या सर्व मोहीमांत अनेक रेनडीयर आणि क्वचित पक्षी त्यांच्या हाती लागले. मागे राहीलेले चार एस्कीमो या सर्व मोहीमांत त्यांच्याबरोबर गेलेले होते! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन यांनी एका मोठ्या एस्कीमो तळाला भेट दिली आणि त्यांच्याकडून माशांचा भरपूर मोठा साठा विकत घेतला!

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ९

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
2 Oct 2014 - 6:59 am

बीची बेटावरुन पुढे निघाल्यावर ग्जो ने बॅरो सामुद्रधुनी गाठली. प्रचंड धुक्याने पुढचं काहीही दिसत नव्हतं. परंतु धुकं निवळल्यावर २६ ऑगस्टला पील खाडीच्या आसपासचे भूप्रदेश त्यांच्या दृष्टीस पडले. सकाळी ९ वाजता ग्जो फ्रँकलीन सामुद्रधुनीतील प्रेस्कॉट बेटाजवळ पोहोचलं असताना अ‍ॅमंडसेनने सहजच कंपासवर नजर टाकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला!

कंपास बंद पडला होता!

दिशादिग्दर्शनासाठी अत्यावश्यक असलेला कंपास बंद पडल्यावर आता एकच मार्ग होता...

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ८

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
30 Sep 2014 - 8:27 am

अटलांटीक मधून उत्तर अमेरीकेच्या किनार्‍याने पॅसिफीक महासागर गाठणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बरोबरच अटलांटीकमधून पूर्वेच्या मार्गाने रशियाच्या उत्तर किनार्‍याजवळून जाणारा नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचे प्रयत्नही १५२५ पासून सुरु होते. इंग्लिश, डच, नॉर्वेजियन आणि मुख्यतः रशियन दर्यावर्दींचा यात सहभाग होता.

प्रवासलेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
27 Sep 2014 - 9:04 am

२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला.

रिपल्स बे, जुलै २९

या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं. त्यानंतर मिळालेल्या माहीतीवरुन आणि एस्कीमोंकडून खरेदी केलेल्या वस्तूंवरुन हे सर्व लोक सर जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेतीलच होते अशी माझी नि:संशय खात्री आहे.

प्रवासलेख