गुस्ताव
तीन साडेतीन वर्षांपूर्वीची एक प्रसन्न शनिवार सकाळ कोपेनहेगन ते स्टोकहोम फ्लाईट आणि मला शेवटून दुसर्या रांगेतली मधली सीट. डाव्या बाजूच्या खिडकीजवळ एक रागीट चेहेर्याचा मिशीवाला आणि उजवीकडे एक साठीतली मावशी ... गुड मोर्निंग वगैरे करून स्थानापन्न झालो..यथासमय विमान हलले आणि कुणीतरी मला हळूच टपलीत मारल्या सारखे वाटले .. भास असेल म्हणून दुर्लक्ष करून मी खिडकी बाहेर बघू लागलो .. विमान रनवे वर धावू लागले आणि पुन्हा एक हलकेच टपलीत ..