रायडींग ऑन अ सनबीम
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे.
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे.
१८५०
१० जानेवारीला एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर यांनी इंग्लंडचा किनारा सोडला. मोहीमेत एकूण ६६ माणसांचा समावेश होता. एंटरप्राईझचा कॅप्टन होता कॉलीन्सन तर एन्व्हेस्टीगेटर मॅक्क्युलरच्या अधिपत्याखाली होतं. विषुववृत्त ओलांडून रिओ-द-जानेरोच्या परिसरात ५ मार्चच्या सुमाराला त्यांना आफ्रीकन गुलामांनी भरलेली जहाजं दृष्टीस पडली. १५ मार्चच्या सुमाराला इव्हेस्टीगेटर मॅजेलन सामुद्रधुनीत शिरलं. मात्रं मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझ यांच्यातील संपर्क तुटला!
१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला.
काल ट्रेनच्या परतीच्या प्रवासात एक किस्सा घडला, वेस्टर्न लाईनला आता लोकल्स डहाणु पर्यंत झाल्या आहेत आणि तेव्हापासुन इथे लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. पालघर या स्टेशनापासुन डहाणु हे तिसरे आणी शेवटचे स्टेशन असल्याने लोकल तशी रीकामीच होती त्यामुळे बर्याच बायका सीटवर पहुडल्या होत्या. ती टी.सी पालघरहुन चढली व एकेक करुन तिकीटे चेक करु लागली. माझ्या मागच्या सीटवर एक काकु झोपल्या होत्या त्यांना तीने उठवले व तिकिट मागितले.
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते.
एक रात्र फुटपाथवरील
पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो.
“... अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा...”
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी.
नमस्कार.
पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का?
कोण कोण मिपाकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे.
कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो.
माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.