पुण्यनगरी बद्दल माहिती हवी
पुढच्या बुधवारी वडोदराहून काढता पाय. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीस आगमन.
गुरुवार आणी शुक्रवारी कामं उरकून जवळजवळ शुक्रवारी दुपारी मोकळा होइन, ते रवीवार रात्र पर्यंत.
आता हे दोन ते अडीच दिवस कसून उपयोगात घ्यायचे.आणी पूर्ण 'पुणे' पाहायचे.
पुण्यात मी दुसर्यांदा-असं म्हटलं तर पहिल्यांद्याच- कारण पहिल्यांदा जवळजवळ तीस वर्षां पूर्वी आलो होतो.
त्या वेळी काही पाहणं जमलं नाही म्हणून- पहिल्यांदाच येत आहे.
तरी मान्य पुणेकरांनी शहरा बद्दल तपशीलवार माहिती द्यावी.
अगदी वेळपत्रकासह माहिती दिल्यास कमी वेळात जास्त पहाणी होउ शकेल.