Fire
पटरीवर रेल्वे भोंगा वाजवत हळुहळु निघाली, धाड.....धुड....धाड.....धुड.....
रिजर्वेशन नाही मिळालं, जायचं अचानक ठरलं.
आम्ही पांढरपेशे, वरच्या शीटावर, पण जनरल बोगीत.
बिस्लरी घेतलीय, वरचा फ्यान चालतोय, डब्यात गर्दीच गर्दी.
आमचे मित्र सहपरिवार, मीही सुटाबुटातला, वरच्या शीटावर तिघचं.
बाकीची खाली, खेटून खेटून बसलेली, प्रवास लांबचा.
टवाळक्या, टपल्या, आणि गप्पा.