जीवनशाळा
गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं
एक अधिक एक बरोबर दोनच असतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं.
फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं
लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं
यशाच्या पायऱ्या चढताच कळतं
इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं.
ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ)
मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता
नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं
इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता.