Skip to main content

जॉन अब्राहम (भाग २)

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 11/01/2025 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अब्राहम (भाग १) (त्याने अचानक ०.४४ कॅलिबर डेरिंजर पिस्तुलाने लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले . . . ) . . . _______________________________________________________________________________________________

१४ एप्रिल १८६५, वेळ सायंकाळी अंदाजे १०:२० वाजता

प्रेक्षकातील काही डॉक्टरांनी लिंकनवर प्राथमिक उपचार करण्याचा तात्काळ प्रयत्न केला. परंतु लिंकनना उपचारासाठी औषधालयात नेणे आवश्यक आहे, परंतु त्यांची अवस्था पाहता त्यांना फार लांब नेता येणार नाही हे लक्षात येताच तेथून लिंकनना जवळच असलेल्या विल्यम पीटरसन यांच्या निवासस्थानी नेण्यात नेले. तेथील पलंग तुलनेने लहान असल्याने व लिंकन बरेच उंच असल्याने त्यांना त्या पलंगावर त्यांना तिरके झोपविण्यात आले. ते रात्रभर बेशुद्धीत होते व डॉक्टर रात्रभर त्यांच्यावर उपचार करीत ह्ते. परंतु उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.. शेवटी दुसर्‍या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांची पत्नी मेरीने हे ऐकताच अपार शोक केला. युद्धमंत्री एडविन स्टँटन यांचे "ते आता देवदूतांचे झाले आहेत" हे वाक्य प्रसिद्ध झाले. लिंकनचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ या दिवशी झाला होता व मृत्यू १५ एप्रिल १८६५ या दिवशी झाला. मृत्युशय्येवर लिंकन मृत्युशय्येवर लिंकन दुसर्‍या दिवशी ईस्टर रविवार होता. त्या दिवशी सकाळी अमेरिकेतील सर्व चर्चमध्ये लिंकन यांच्या हौतात्म्याची तुलना येशू ख्रिस्ताच्या हौतात्म्याशी करण्यात आली व त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली (१८६१ मध्ये अल्प काळात अमेरिकेत सर्वत्र हे वृत्त कसे पोहोचले असेल हे समजत नाही). लिंकन यांचे अनेक विरोधक सुद्धा हळहळले. काही काळ लिंकन यांचे पार्थिव व्हाईट हाऊस मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवल्यानंतर, पुढील १३ दिवस त्यांचे पार्थिव आगगाडीतून देशातील विविध भागात नेऊन शेवटी स्प्रिंगफील्ड (इल्युनॉय) येथे नेण्यात आले. फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क येथील ५ व्या रस्त्यावर सुद्धा पार्थिव नेण्यात आले होते. लक्षावधी नागरिकांनी आपापल्या राज्यात लिंकन यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. लिंकन यांचे शव घेऊन जाणारी आगगाडी. एकूण १३ शहरातून हे शव नेण्यात आले होते. लिंकन यांचे शव घेऊन जाणारी आगगाडी. एकूण १३ शहरातून हे शव नेण्यात आले होते. कोण होता हा मारेकरी? ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ ============================================================================== _____________________________________________________________________________________________________ (ठरल्याप्रंमाणे केनेडी दांपत्य २१ नोव्हेंबर १९६३ या दिवशी एअर फोर्स १ या अध्यक्षांसाठी राखीव असलेल्या विमानातून टेक्ससच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर निघाले. ते टेक्सस राज्यातील ५ शहरांना भेट देणार होते. ) . . . _________________________________________________________________________

२१ नोव्हेंबर १९६३

टेक्ससमध्ये केनेडी पहिल्यांदा सॅन अ‍ॅंतोनिओ येथे पोहोचले. उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन, मुख्यमंत्री जॉन कोनाली आणि खासदार राल्फ यारबरो त्यांच्या स्वागतासाठी होते. तेथून ते ह्यूस्टन येथे लॅटिन अमेरिकन नागरिकांच्या एका संमेलनात सामील झाले आणि दिवस संपताना ते डॅलसपासून जवळ असलेल्या फोर्ट वर्थ शहरात पोहोचले. शुक्रवारी २२ नोव्हेंबरला फोर्ट वर्थ येथे हलकासा पाऊस पडत होता. तरीसुद्धा ते रात्री मुक्कामास असलेल्या टेक्सस हॉटेलच्या बाहेर हजारो समर्थक जमा झाले होते. ते पाहून छत्री, रेनकोट वगैरे न घेता केनेडी बाहेर आले आणि त्यांनी समर्थकांसमोर लहानसे भाषण केले. आपल्या लहानश्या भाषणात त्यांनी आर्थिक वृद्धी, संरक्षण क्षेत्र आणि अंतराळ संशोधन यावर भर दिला.या भाषणाला समर्थकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. हॉटेलमध्ये परत येऊन त्यांनी फोर्ट वर्थ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांशी वार्तालाप केला. तेथून ते कार्सवेल या लष्कराच्या विमानतळावर जाऊन विमानातून डॅलसला लव्ह फील्ड विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत थांबले होते. त्यातील अनेकांशी त्यांनी हस्तांदोलन केले. जॅकलीन केनेडींना समर्थकांनी लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. टेक्ससचे मुख्यमंत्री जॉन कोनाली व त्यांच्या पत्नी नेल्ली आधीच एका उघड्या छतहीन गाडीत बसले होते. केनेडी दांपत्य त्या गाडीत कोनाली दांपत्यांच्या मागील आसनावर आसनस्थ झाले. उपाध्यक्ष जॉन्सन व त्यांच्या पत्नी त्यांच्या पाठोपाठ असलेल्या एका दुसर्‍या गाडीत बसले. जॉन केनेडी व जॅकलीन केनेडी डॅलस लव्ह फिल्ड विमानतळावर जॉन केनेडी व जॅकलीन केनेडी डॅलस लव्ह फिल्ड विमानतळावर गाड्यांचा ताफा विमानतळावरून निघाला. १० मैलांवर असलेल्या ट्रेड मार्ट येथे अध्याक्षांबरोबर समर्थकांचा भोजनसमारंभ आयोजित केला होता. अध्यक्षांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो समर्थक उभे राहून अध्यक्षांची प्रतीक्षा करीत होते. गाडीतून जाताना हात हलवित ते केनेडींचे स्वागत करीत होते. दुपारी १२:३० च्या सुमारास मुख्य रस्त्यावरून केनेडींच्या कारने डीले प्लाझापासून वळण घेतले. टेक्सस शालेय पुस्तके संग्रहालयापाशी केनेडींची गाडी पोहोचली असताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. कोणाला काही कळण्याच्या आतच अध्यक्ष केनेडींच्या मानेत आणि डोक्यात गोळ्या घुसल्या. त्याच वेळी मुख्यमंत्री कोनालींच्या पाठीतही गोळी घुसली. _________________________________________________________________________________________ (क्रमशः)
लेखनविषय:

वाचने 3122
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया