गजेंद्र

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
2 Sep 2022 - 9:21 pm

चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या
सृष्टी आणि प्रकृतीच्या
रक्षाबंधनाच्या
कर्तव्याला पाळण्यासाठी
साक्षात रुद्राच्या
रौद्ररुपाला झेलणार्‍या
त्यागी गजानना तुझ्या शौर्याला
आमचे शतशः नमन असो.

Nisargगजेंद्रनिसर्गमाझी कवितामुक्त कविताविठोबाशिववंदनाश्रीगणेशवीररसरौद्ररसशांतरसचारोळ्यामुक्तकव्यक्तिचित्र

कुणास ठाऊक ?

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
17 Mar 2016 - 10:55 pm

कुणास ठाऊक ?
काय शोधण्यासाठी
काय साधण्यासाठी
या जगात आलोय आम्ही

कुणास ठाऊक ?
काय जाणण्यासाठी
काय गणण्यासाठी
या जगात आलोय आम्ही

कुणास ठाऊक ?
काय जिंकण्यासाठी
काय थुंकण्यासाठी
या जगात आलोय आम्ही

कुणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नुसतेच मरण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
आत्मशोध (काव्यसंग्रह)

गजेंद्रकविता

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
27 Feb 2016 - 12:47 pm

डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो

वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

फारसे चखणे नसावे वाटीतही
मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो

ही मळलेली वाट आहे पण इथे
परताना मी किती ठेचकाळतो

कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर
रंग शर्टाचा कसा डागाळतो

केवढे जडशीळ झाले हे नयन
देव जाणे कसा तोल सांभाळतो

अदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगजेंद्रगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीरोमांचकारी.हझलवीररसगझलसुभाषितेतंत्रविज्ञानकृष्णमुर्ती