✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली

च — चामुंडराय, Sun, 01/28/2018 - 05:25
( सुरेश भट _/\_ ) चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली उघडले कधीचे गुत्त्यांचे द्वार बंद अन्‌ चोरपावलांनी आला देशीचा गंध गल्ल्यावरी गुत्त्याच्या आंटी येऊन बसली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली चल लवकरी आता पहिल्या धारेचा सहारा मोसंबी नारंगी ठर्रा करती तुझा पुकारा सज्ज साथ देण्या पापड अंडी चकली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली तव याद करिती सारी बेवड्यांची मांदियाळी घे एक घोट नवटाक चिंता सर्व जाळी तुज शोधण्यास वेडी बायको पुन्हा निघाली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली

प्रतिक्रिया द्या
5762 वाचन

💬 प्रतिसाद (7)

..

manguu@mail.com
Sun, 01/28/2018 - 10:12 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लय भारी !

धर्मराजमुटके
Sun, 01/28/2018 - 12:51 नवीन
लय भारी !
  • Log in or register to post comments

मस्तच!!!

दमामि
Mon, 01/29/2018 - 11:52 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments

मस्तच..

विशुमित
Mon, 01/29/2018 - 15:24 नवीन
मस्तच.. तुज शोधण्यास वेडी बायको पुन्हा निघाली... हे दृश्य नेहमी पाहत असतो चौकात. पदर खोचून त्याला उचलून नेताना हा अविर्भाव असतो '''बेवडा का असेना पण नवरा आहे माझा.""
  • Log in or register to post comments

manguu@mail.com, धर्मराजमुटके, दमामि आणि विशुमित

चामुंडराय
Tue, 01/30/2018 - 08:48 नवीन
manguu@mail.com, धर्मराजमुटके, दमामि आणि विशुमित आपण सर्वांचे प्रोत्साहनासाठी आभार _/\_
  • Log in or register to post comments

खुप मस्त......

राजाबाबु
Fri, 02/02/2018 - 13:09 नवीन
खुप मस्त......
  • Log in or register to post comments

धन्यवाद राजाबाबु

चामुंडराय
Sat, 02/03/2018 - 09:00 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाबाबु

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा