स्फुटः संन्यास...
गृहितक: या विषयावर विचार करतांना भगवंत आहे, सर्व चराचरांत व्याप्त आहे, आणि मनापासून ईच्छा असल्यास साधनमार्गावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.. हे मी गृहित धरलेलं आहे.
बर्याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो.
संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं.
कशापासून निवृत्त व्हायचं?
जगापासून.