एकांत
कोणते हे फूल, वा
काय त्याचे नाव?
विचारतो ना सांगतो
तो स्वतः शी बोलतो!
कळी आज लाजते
फूल उद्याला हासते
पाहतो! ना बोलतो,
तो स्वतः शी हासतो!
रंग हिचा केशरी
गर्द तिचा सोनेरी
स्पर्शतो ना तोडतो
तो स्वतःशी रंगतो!
...... .....
फूल त्याच्या अंतरीचे
किती कसे कळलावे?
डोलते ना थांबते
वाऱ्यातून हुरहुरते!