प्रेमाची भाषा
प्रेमाची दोघांचीच अशी भाषा असते...
झुकलेल्या पापण्यात ती हळुवार रुजते...
शब्दांशिवाय नकळत हृदयात उतरते...
दोघांच हितगुज दोघांना सांगते!
कधी ती कविता होते..
शब्दातून कागदावर उतरते...
कधी गुलजार.. कधी जगजीत.. कधी मेहँदी हसन बनते;
लता-आशाच्या गळयातुन... ए. आर. रेहेमानच्या संगीतातुन...
अशीच ती घरंगळते;
दोघांच हितगुज दोघांना सांगते...
प्रेमाची भाषा स्पर्शातुन फुलते;
तरीही तिला शब्दांचे ख़त-पाणी लागते...
मग ती रुजुन, बहरुन, उमलते....
दोघांचे हितगुज दोघांना सांगते!