भावकविता

आंगणवाडी ते ....

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
25 Jun 2015 - 3:29 pm

नमोच्या जपाने काँगी हरले,
खेळ तोच हो,
फक्त खेळाडू बदलले ,

पल्ला माझा हजार कोटींचा,
घेवु द्या ना मोठी उडी,
आताशी हडपलेत फक्त २०० कोटी,
ही तर नव्हे जगबुडी,

वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल,
बाळ गोपाळांच्यात मी रमले,
कधी, कुठे, कशी,
खायची चिक्की,
आंगणवाडीनेच शिकवले,

तुझा मोठा घोटाळा की माझा ,
हे ठरवेल जनता किंवा समिती,
तु आधी मी आधी करत,
भरुन टाकुया स्वीसची खाती ,

पापा होते तो कहते ,
बडा नाम करेगी बेटी मेरी,
पण बाबा गेला दुर देशी
न ये तो माघारी,

बालसाहित्यभावकविताहझलभयानकधोरणमांडणीकविता

पाऊस.... .वेगवेगळा •○●¤°

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
20 Jun 2015 - 2:56 pm

खेड्यातला जाणता पाऊस
जबाबदारीनं गाव रान भिजवणारा,
म्हातार्या कोतार्यांची अलाबला
नी पिकांची दुवा घेणारा ....!!

शहरातला अप टु डेट पाऊस
ऑफीस शाळांच्या वेळेत हमखास येणारा
नौकरीदारांच्या शिव्या नी पालकांची बोलणी
गप गुमानपणे ऐकणारा...!!

घाटातला धटिंगन पाऊस
निर्वस्त्र, निर्लज्ज कसाही कोसळणारा ,
धबधब्यांना जागं करून
आनंदानं नाचविणारा....!!

बागेतला खट्याळ पाऊस
रेंगाळलत गुलाबी होवून पडणारा ,
प्रेमीकांची भिड चेपायला
सजल हस्ते मदत करणारा...!!

भावकविताकविता

मौनांची भाषांतरे

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
19 Jun 2015 - 9:59 am

तसा हट्ट नाहिये माझा
अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील
मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी
माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध
सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र,
नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र
अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे
तसा हट्टच नाहिये माझा
फक्त
बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे

#जिप्सी
#gypsykavita.blogspot.in

भावकविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

पाऊस .. तेव्हाचा

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
16 Jun 2015 - 1:54 pm

खर्‍याखुर्‍या प्रेमासारखा
पाऊस तेव्हा दाटायचा
बरोब्बर सात जूनला
येवून तो भेटायचा....!!

अडचणी होत्या चिकार
सर्व दूर करायचा,
मन हुरहुरलं की
हात तो धरायचा ....!!

तेव्हाचा पाऊस खरा
खरा पाऊस वाटायचा,
प्रत्येकाच्या आठवांत
घर तो थाटायचा ....!!

लहान, थोर, वडीलधारे
आदर तो राखायचा,
सार्‍यांच्या चेहर्‍यावर
आनंद तो माखायचा....!!

रसायन, फवारे वगैरे
लाडावलेला नसायचा,
येरे येरे पावसाच्या
गाण्यालाही फसायचा....!!!!

भावकविताकविता

जन्म घेतला तेव्हाच....!!

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
11 Jun 2015 - 8:20 am

जन्म घेतला तेव्हाचं
खोदून कबर आलो
औपचार म्हणून
आयुष्य घालवीत होतो

आलो त्याच्या कडून
जायचे त्याच्याच पाशी
प्याला जीवनाचा
घोट घोट संपवित होतो

परत करावयाचा उसना
देहाचा अंगरखा हा
मिजाशीने त्याला
म्हणुन वागवीत होतो

पुरी होती करावयाची
कहाणी जिंदगी ची
आयुष्याची कोरी पाने
मी जगुनी भरवीत होतो

उभ्या आडव्या धाग्यातून
निसटणार शिताफिने
नाती स्नेहाची मी
वृथा गुंतवित होतो

होता सोडायचाच
मंच दुनियेचा
तोंड रंगुवुनी पात्र
मात्र वठवित होतो!!

भावकविताकविता

मित्रवेडा

विनीत संखे's picture
विनीत संखे in जे न देखे रवी...
2 Jun 2015 - 6:51 pm

कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प
चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स.
थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली
ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स.
डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं
अन तंद्री भंग होता होत नाही
पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना
मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.

फ्री स्टाइलभावकविताकवितासमाजनोकरीशिक्षणमौजमजा

अजुनी दूर किनारे

अर्व's picture
अर्व in जे न देखे रवी...
25 May 2015 - 12:43 pm

उरलेत भाव काही
संपलेत शब्द सारे
संपला प्रवास केव्हाच
अजुनी दूर किनारे

जेथे मैफीली सुरांच्या
होत्या कधी काळी
सजली तिथे आता
जखमांची मांदीयाळी

भिजलेला श्रावणगंध
वाहती अजूनी वारे ...
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे ...

वाटेतल्या फुलांनो
रोखा श्वास तुमचे
विपरीत अर्थ आहेत
तुमच्या स्पंदनांचे

क्षण शेवटाचा उशाशी
तरीही गंध का रे?
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे

कवी :  निशांत तेंडोलकर ..

भावकविताकविता

रातीत लाज ओली

अर्व's picture
अर्व in जे न देखे रवी...
18 May 2015 - 12:31 pm

रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.

पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता

घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.

माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...

कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)

भावकवितासमाज