भूगोल
वाट पहात आहे.....
त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
बसेन ते झाड माझे,
शिटेन ती फांदी माझी,
असले त्याचे आक्रमण नाही!
घरटोघरटी माझी पिले
माझ्याच पिढ्या, माझेच वंश
असली माणुसकी त्याची नाही!
मैत्री कधी कुणाशी केली नाही,
पण बुडत्या मुंगीसाठी
पान टाकायचे विसरला नाही!
चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि
तोऱ्याने मान फिरवणे नाही!
पंखांचे मिटणे केवळ सुंदर
जणू मौनाचे शिल्प पुरातन!
पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
युगायुगांची पौर्णिमा उजळावी
इतके त्याचे पंख सतेज!
...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)
"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :)
कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :)
आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ? :) :)
< < < < मजबूरी हय > > > >
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.
ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!
निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
प्रस्तावना
आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो.
एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ७ (अंतिम)
तू फूल कुणाचे देखणे?
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!
रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा?
जा निघून हलक्या पायाने....
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू.....
-शिवकन्या
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
काळ असा.......
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद!
त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!]
माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला,
‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’
मी करड्या रंगात ब्रश बुडवला,
गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.
त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले,
‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!
पक्षी कसा काढायचा हे पण माहिती नाही तुम्हाला?’
मी म्हणालो, ‘माफ कर मुला,
मी पक्ष्यांचे रंग-आकार विसरून गेलोय आता!’