सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
15 Apr 2016 - 7:35 pm | विजय पुरोहित
वा! ताई!
तुमची स्वतंत्र स्टाईल लगेच ठाव घेते मनाचा. अप्रतिम लिहिता.
अजून लिहीत रहा! वाचत राहू!
चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना या गीताची आठवण झाली.
15 Apr 2016 - 7:37 pm | विजय पुरोहित
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!
अगदी killer आहेत या ओळी...
15 Apr 2016 - 7:37 pm | विजय पुरोहित
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!
अगदी killer आहेत या ओळी...
15 Apr 2016 - 9:02 pm | प्राची अश्विनी
क्या बात!
15 Apr 2016 - 9:06 pm | विजय पुरोहित
सहमत प्राचीतै...
राजकीय धुळवड आणि आस्तिक नास्तिक कळवंडीपेक्षा असले लेखन 100 टक्के चांगले..
15 Apr 2016 - 9:36 pm | बोका-ए-आझम
रूपकात्मक कविता आवडली.
15 Apr 2016 - 10:14 pm | रातराणी
मस्त!
16 Apr 2016 - 12:50 am | चाणक्य
मांत्रिक भाऊ म्हणाले तसं पहिल्या चार ओळी एकदम किलर.
16 Apr 2016 - 11:57 am | चांदणे संदीप
आशयाची शब्दांशी गट्टी नाही जमली
नको म्हणता धरलेली फुगडीही सुटली
स्वारी, नाही आवडली!
Sandy
16 Apr 2016 - 12:04 pm | अभ्या..
सॅन्डीबाबाला सहमत
रुपकांचा अंमळ घोळ होतोय का? मला अंदाज लागेना. :(
16 Apr 2016 - 10:34 pm | शिव कन्या
लागेल अंदाज. काय घाई? आहोत इथेच !
16 Apr 2016 - 10:32 pm | शिव कन्या
प्रांजळपणा आवडला. :)
रच्याकने, फुगडीसाठी कविता नसते ! आपल्यासारख्या रसिकास वेसांनल.
16 Apr 2016 - 10:29 pm | शिव कन्या
विजय पुरोहीत,प्राची अश्विनी ,बोका ए आझम, रातराणी, चाणक्य रसिकतेने वाचताहात...धन्यवाद .
17 Apr 2016 - 3:13 pm | माहितगार
कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या परिस्थितीवर असेल, पण का कोण जाणे ते मला सहजच मोठ्याशहरात आलेल्या शहरी कष्टाच्या उन्हात होरपळून निघणार्या बालकामगारांवर अथवा कोवळ्या वयातील तरुणांवर लावावे वाटले.
14 Sep 2016 - 12:46 am | प्रभास
अगदी बरोबर... असेच वाटते... पण मूळ रचनाच इतकी सुंदर आहे की तिच्या गर्भरेशमी अर्थाच्या कोंदणातून बाहेर पडूच नये असे वाटते... :)
17 Apr 2016 - 7:34 pm | बोका-ए-आझम
जर्मन कवी Heinrich Heine यांची एक कविता होती - त्याचा मतितार्थ या कवितेप्रमाणेच होता. शब्द दुर्दैवाने आठवत नाहीयेत.
14 Sep 2016 - 12:33 am | प्रभास
अशा अधिकाधिक रचना अपेक्षित आहेत... खूप सुंदर लिहिता...
14 Sep 2016 - 3:19 pm | पथिक
काय ओळी आहेत !
अवघी कविताच सुंदर आहे.