छोट्यांचे पुस्तकविश्व
.inwrap
{
background-color: #DFEDF8
}
.inwrap
{
background-color: #DFEDF8
}
एक होता छबु
भलताच ढबू
बुद्धिचा जड
पण करी बडबड
एकदा झाली गम्मत
बसली होती पंगत
जेवायला होते लाडू
छबु किती वाढू
लाडू खाल्ले अठ्ठावीस
जीव झाला कासाविस
पोट आले फुगून
मग गेला भिऊन
पोट लागले दुखायला
तसा लागला लोळायला
रडला ओरडला तरी किती
खादाडरावांची झाली फजिती
-- संग्रहित
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या
प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या!
गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही
डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!"
सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत.
"काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. "
येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून.
लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून.
हिरव्या शालूत
कळी लाजली
फुलपाखराचे जी
झिंगाट झाले जी.
फिरफिर नाचला
शिट्टी वाजवली
झिंगत म्हणाला
आय लव यू.
झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.
प्रिन्स चिमण्याने
डाव साधला
बेसुध फुलपाखरू
चोचीत धरला.
फुलपाखरू खाऊन
चिवताई खुश
चिवचिव प्रिन्स
आय लव यू.
झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.
दूर झाडावर काळा कावळा त्यांचे प्रेमाचे चाळे बघत होता,.......
पाभेअंकलची सॉरी मागून हे लिहित आहे,
माफी असावी. वय पाहून दुर्लक्ष्य करावे.
.............................
किती लौकर आज उजाडलं बाई
स्कूलच्या होमवर्काला काळवेळ नाही
काल रात्री बघत बसलो छोटा भीम
एवढी नाय भारी त्याची सध्याची थीम
कंटाळून शेवटी रिमोट फेकून मारला
हाय....
बाबांनी टीव्ही बंद करुन उठवले
बेडवर टाकून लाइट बंद केले
अंधारातून तो भीम रोखूनी पाही
किती लौकर आज उजाडलं बाई
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.
ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!
डोनल्ड आणि मिकीवरून, हटत नाही नजर
गूफीच्या गोंधळाचे तर, हासू येते भरपूर
मधेच लाईट जाता, येतो अश्रूंचा पुर
आजीला देउन हुल , बाळ पळते दूर
पण दार असते बंद, बाहेर जाता येत नाही
नेमके अशाच वेळी, बाबा घास भरवू पाही
ओठांचा होतो चंबू, त्याला उघडावे कसे
त्रेधा उडवून सर्वांची, बाळ खुदूखुदु हसे
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!
इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!
बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!
- संदीप चांदणे
आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील.
पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नहीं.
फिरू फिरू करतो
घुमू घुमू करतो
घूं घूं करूत तो
नुसताच फिरतो.
हातवारे करते किती
स्माईली-स्माईली देते
गाढव लेकाला पण
काही कळतच नाही.
मला पाहून तो
हसतच नाही.