✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

किती लौकर आज उजाडलं बाई

प
पाषाणभेद यांनी
Sat, 05/21/2016 - 04:55  ·  लेख
लेख
किती लौकर आज उजाडलं बाई कानडाऊ योगेशू यांच्या या रचनेत रोमांचीत कल्पना आहे. सजणप्रेमाने व्याकूळ झालेली विव्हलता रेखाटली आहे. कुणाचे प्रेम रांगडे असते जसे एखादा जव्हेरगंज "जीव नांगरटीला आलाय" म्हणून हक्काने मागून घेतो किंवा एखादा अल्लड प्रेमाने भारून आपल्या प्रियतमेचे प्रियाराधन करण्यास संकोचतो. कानडाऊ योगेशूंच्या काव्यातल्या एका प्रतिसादामध्ये प्रचेतस यांनी माझी आठवण जागवली. त्या आठवणीत माझ्या जुन्या आठवणी आठवल्या आणि त्यांच्या आठवणीस जागतांना खालील काव्य लिहीता झालो. किती लौकर आज उजाडलं बाई सजणाच्या प्रितीला काळवेळ नाही काल रातीला असाच आला तो द्वाड येळी अवेळी यायची त्याला लई खोड गुलूगुलू बोलत हात हातामधी धरला हाय.... गुलूगुलू बोलत हातामधी हात धरला अंगाअंगी रोमांच थरथरला डोळ्यामधी तो रोखूनी पाही किती लौकर आज उजाडलं बाई साडी भरजरी ल्याले मी अंगा कुंकू कपाळी केले मोती भांगा कानी कुडी नथनी नाकात गळा सर ठुशी वाकी दंडात कमरी पट्टा अन पैंजण पायी दरएक दागीना (सजण) उतरत जायी किती लौकर आज उजाडलं बाई किती हसावं किती पुसावं गोड गुपीत मुक्यानं कसं सांगावं अवचिंद पावसानं मन मोर व्हावं धरती भिजावी पेर्‍यात रानं पिकावं मिठीत त्याच्या अंगा शिरशिरी येई ओठी आठवांचे ठसे राही ठाईठाई किती लौकर आज उजाडलं बाई - पाभे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता
प्रेमकाव्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
5746 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

क्या बात है पाभे...!!! बेस्ट.

प्रचेतस
Sat, 05/21/2016 - 06:10 नवीन
क्या बात है पाभे...!!! बेस्ट.
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Sat, 05/21/2016 - 08:06 नवीन
छान शृंगारिक काव्य...
  • Log in or register to post comments

पाभे

नाखु
Sat, 05/21/2016 - 08:41 नवीन
लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन आणि त्यांना उद्युक्त केल्याबद्दल कायो आणि प्रचु @@@@ यांचे खास आभार. पाभे लेखन पंखा नाखु
  • Log in or register to post comments

अवघड आहे.

प्रचेतस
Sat, 05/21/2016 - 08:52 नवीन
अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/21/2016 - 09:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इथे ब्रेच जाणकार हैत....काहि

टवाळ कार्टा
Sat, 05/21/2016 - 11:52 नवीन
इथे ब्रेच जाणकार हैत....काहि औघड वाट्ले त्र विचारा त्यांना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काही

चौकटराजा
Sat, 05/21/2016 - 12:17 नवीन
काही बरेच हिरवे पारवे जाणकार काही नुकतेच जाणकार झालेले .. तर काही........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आले, हिरवट काका आलेच. :)

प्रचेतस
Sat, 05/21/2016 - 12:19 नवीन
आले, हिरवट काका आलेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वाह्ह! लाजव्वाब!

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/21/2016 - 09:24 नवीन
वाह्ह! लाजव्वाब!
  • Log in or register to post comments

मस्त...

चौकटराजा
Sat, 05/21/2016 - 10:29 नवीन
मी म्हणतो काही द्वाड मंडळी रहातात त्या भागातून जाताना हे काव्य सुचलं का..... ? भन्नाट आहे. शब्दबंध छान आहे पण काही जागी धरबंध सुटला आहे. गोड गुपीत मुक्यानं कसं सांगावं या ओळीत श्लेषबंध चान चान वापरला आहे.
  • Log in or register to post comments

लोलबंध.

प्रचेतस
Sat, 05/21/2016 - 10:33 नवीन
लोलबंध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वा क्या बात है!

चतुरंग
Sat, 05/21/2016 - 11:42 नवीन
पावसाळा आलाच आहे लावणीच्या दिवसात लावणी व्हायलाच हवी पाभे! :) (लावणीप्रेमी)रंगा खेबूडकर
  • Log in or register to post comments

क्लासिक!

चांदणे संदीप
Sat, 05/21/2016 - 12:26 नवीन
प्रतिसादाच्या प्रेमापोटी, पाभेंनी, हात धरूनी यावे बहारदार काव्य बैठकी रचूनी सादर व्हावे रसिकसख्यांच्या संगतीने मन भारूनी जावे! Sandy
  • Log in or register to post comments

माझी कविता निमित्तमात्र ठरली

कानडाऊ योगेशु
Sat, 05/21/2016 - 13:00 नवीन
माझी कविता निमित्तमात्र ठरली ह्याचा आनंद आहेच.पण केवळ अप्रतिम लिहिले आहे पा.भे साहेब तुम्ही.!
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर षृंगारिक कविता !

प्रसाद गोडबोले
Wed, 06/08/2016 - 12:44 नवीन
खुपच सुंदर षृंगारिक कविता ! मस्तच पाभे ! आपला जुना फॅन प्रगो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा