(भूक भागत नाही)

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
13 Apr 2016 - 8:05 pm

प्रेरणा

डोनल्ड आणि मिकीवरून, हटत नाही नजर
गूफीच्या गोंधळाचे तर, हासू येते भरपूर
मधेच लाईट जाता, येतो अश्रूंचा पुर
आजीला देउन हुल , बाळ पळते दूर
पण दार असते बंद, बाहेर जाता येत नाही
नेमके अशाच वेळी, बाबा घास भरवू पाही
ओठांचा होतो चंबू, त्याला उघडावे कसे
त्रेधा उडवून सर्वांची, बाळ खुदूखुदु हसे

हताश होऊन सारे बसता, आई येते धावून
पप्पाकडून घेऊन ताट, बसते माझे खेळ काढून
डोनल्ड मिकी गूफी, मला कुणीच लागत नाही
टीवी झाला बंद तरी, त्यांची आठवण येत नाही
देते हातामध्ये घास, काउचिउला देण्यासाठी
मलाही भरवते त्यांच्यासंगे, सांगत परीच्या गोष्टी
आंबट लोणचं चाखायचं, माझ्यासारखचं करते नाटक
मी घास खाण्यासाठी, न्य्म न्य्म करते आवाज
हळूच आणते खीरीची वाटी, जेवण संपत आले की
मग मात्र मला, अजिबात लाडिगोडी लागत नाही
सारे होते चट्टामट्टा, उरतो एक उलूसा घास
तो आईला भरवल्याशिवाय, माझी भूक भागत नाही

बालगीतविडंबन

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

13 Apr 2016 - 8:09 pm | विजय पुरोहित

गोड कविता...

सुधीरन's picture

13 Apr 2016 - 8:11 pm | सुधीरन

अगदी प्रत्येक घरातल्या वातावरणाचे सुंदर शब्दचित्र.

चांदणे संदीप's picture

13 Apr 2016 - 10:14 pm | चांदणे संदीप

रातराणीतै, एकच नंबर!! लैच्च आवडली!
ते "न्य्म न्य्म" तर अगदी डिट्टो! आंबट लोणच चाखायच नाटक वगैरे, एक संपूर्ण गोड प्रसंग दिसला. :)

प्रतिसाद लिहिताना जाणवलं की शिर्षकाला कंसात टाकलय.... मग वर जाऊन खात्री झाली. पण, खर सांगतो याला विडंबन म्हणायची गरज नाही इतके अस्सल लिहिलेय!

लिखते रहो!
Sandy

चांदणे संदीप's picture

13 Apr 2016 - 10:15 pm | चांदणे संदीप

रातराणीतै, एकच नंबर!! लैच्च आवडली!
ते "न्य्म न्य्म" तर अगदी डिट्टो! आंबट लोणच चाखायच नाटक वगैरे, एक संपूर्ण गोड प्रसंग दिसला. :)

प्रतिसाद लिहिताना जाणवलं की शिर्षकाला कंसात टाकलय.... मग वर जाऊन खात्री झाली. पण, खर सांगतो याला विडंबन म्हणायची गरज नाही इतके अस्सल लिहिलेय!

लिखते रहो!
Sandy

नाखु's picture

14 Apr 2016 - 8:23 am | नाखु

एक बाळसेदार कवीता

रातराणी's picture

14 Apr 2016 - 12:02 pm | रातराणी

धन्यवाद!
संदीप धन्यवाद धन्यवाद :)