(किती लौकर आज उजाडलं बाई)............निकोलोडिऑन व्हर्शन

अभ्या..'s picture
अभ्या.. in जे न देखे रवी...
21 May 2016 - 2:57 pm

पाभेअंकलची सॉरी मागून हे लिहित आहे,
माफी असावी. वय पाहून दुर्लक्ष्य करावे.
.............................
किती लौकर आज उजाडलं बाई
स्कूलच्या होमवर्काला काळवेळ नाही

काल रात्री बघत बसलो छोटा भीम
एवढी नाय भारी त्याची सध्याची थीम
कंटाळून शेवटी रिमोट फेकून मारला
हाय....
बाबांनी टीव्ही बंद करुन उठवले
बेडवर टाकून लाइट बंद केले
अंधारातून तो भीम रोखूनी पाही
किती लौकर आज उजाडलं बाई

चौकडी चौकडी युनिफॉर्म घालून अंगा
चप्प तेल लावून आईने पाडले भांगा
पाठीशी लावली सॅक, वॉटरबॅग हातात
टिफीन गळतोय, रंगीत आयकार्ड गळ्यात
कमरी रंगीत पट्टा अन शूज पायी
इतके सारे घेऊन कुठे जाउच वाटत नाही
किती लौकर आज उजाडलं बाई

किती सांडावं किती पुसावं
गोड बिस्कीट गुपचूप कसं खावं
वाटे स्कूलबसचा आज ड्रायव्हर व्हावे
सगळ्यांना मागे टाकून पुढेच राहावे
पोलीसमामा मागे येता सायरन वाजवावी
कशी वाजते ते मात्र माहीतच न्हाई
किती लौकर आज उजाडलं बाई

- आभे
थड्ड स्ट्न्डर्ड, जास्मिन ग्रुप
लिटिल एंजल्स स्कूल.
(आमच्या स्कूलमध्ये निंजा हातोडी आणि डोरेमान हायेत)

बालसाहित्यबालगीत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2016 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

21 May 2016 - 3:07 pm | अभ्या..

कुणाला "फार छ्छान करता हो विडंबन तुम्ही, अजून येऊद्या ना"
आम्हाला मात्र एक ठिपका देउन नुसते हम्म.
.
चालायचेच म्हणा. आम्हाला कुठे डार्लिंग म्हणता येतय :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2016 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'' खामोशिया हि बेहतर है
लब्जो से लोग रुठते बहुत है ''

-दिलीप बिरुटे

बाबा योगिराज's picture

21 May 2016 - 3:34 pm | बाबा योगिराज

म्हणजे, आज मौन व्रत हाय म्हणाच की वो.

सतिश गावडे's picture

21 May 2016 - 3:41 pm | सतिश गावडे

'' खामोशिया हि बेहतर है
लब्जो से लोग रुठते बहुत है ''

वाह... क्या बात कही डाक्टरसाहब आपने.

जव्हेरगंज's picture

21 May 2016 - 6:24 pm | जव्हेरगंज

=))

प्रचेतस's picture

21 May 2016 - 3:02 pm | प्रचेतस

अगागागागा. =))
ठार झालो. कथा कुणाची व्यथा कुणाला. काळजाला भिडलं.

ते निकोलोडिऑन म्हणजे काय नै समज्लं.

सतिश गावडे's picture

21 May 2016 - 3:38 pm | सतिश गावडे

ते निकोलोडिऑन म्हणजे काय नै समज्लं.

ते लहान मुलांसाठीचं टीव्ही चॅनल आहे.

प्रचेतस's picture

21 May 2016 - 3:46 pm | प्रचेतस

ओह्ह =))

चलत मुसाफिर's picture

22 May 2016 - 11:37 am | चलत मुसाफिर

पहलाज निहालानी व्हर्शन हे नाव जास्त शोभतं

रमेश भिडे's picture

21 May 2016 - 3:21 pm | रमेश भिडे

तिसरी च्या मानानं बरं जमलंय.

पालकांना घेऊन ये सोमवारी.

बाबा योगिराज's picture

21 May 2016 - 3:36 pm | बाबा योगिराज

और ये हय विडम्बन करनेकी निंजा टेक्निक.

डिंग डिंग

चांदणे संदीप's picture

21 May 2016 - 3:41 pm | चांदणे संदीप

अजून थोडं खालच्या यत्तेतलं पायजेल होतं राव!
=))
"आभे" =)) __/\__

Sandy

यशोधरा's picture

21 May 2016 - 5:10 pm | यशोधरा

अग्गाग्गा =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2016 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही!

कानडाऊ योगेशु's picture

21 May 2016 - 5:16 pm | कानडाऊ योगेशु

खरे तर लवकर किती उजाडले आहे आज हा फिल सकाळची शाळा असणार्या सर्वच लहानग्यांना येत असतोच असतो.
त्याअर्थाने धिस इज द मोस्ट रिअ‍ॅलिस्टीक कविता.!

पद्मावति's picture

21 May 2016 - 5:45 pm | पद्मावति

:) एकदम क्यूट कविता. आवडली.

पाषाणभेद's picture

22 May 2016 - 3:11 am | पाषाणभेद

विडंबन जरी नसले असते तरी चालले असते. योगेश म्हणतो तशी रिअलिस्टीक आहे. :-)

कंजूस's picture

22 May 2016 - 11:44 am | कंजूस

कार्टुन चित्र कुssssठंsssय?

शिव कन्या's picture

23 May 2016 - 12:06 am | शिव कन्या

इतके सारे घेऊन कुठे जाउच वाटत नाही
नेमक्या वर्मावर बोट!
चांगली कविता!

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2016 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा

किती लौकर उजाडलं झाली घाई
वावराच्या साइडला कुणी बसलच नाही! ;)

वावर, त्याची साईड आणि बसणे हा आत्मबंध गुर्जींचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2016 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा

ह्या बाबतीत सदर प्रति क्रीयक आमच्यापेक्षा कितीतरी अधिक जिव्हाळ्याने कायमच आमचेशी बोलत असतो.
यांचे सदर विधान "मी नाही डबड्यातली, अन् जागा राखा वावरातली! ". अश्या स्व-रूपातील आहे!

प्रचेतस's picture

23 May 2016 - 9:35 am | प्रचेतस

हो.
कारण मला अशा कविता फार फार आवडतात आणि तुमच्याइतक्या तन्मयतेने अशा प्रत्ययकारी कविता इतर कोणीच लिहू शकत नाही.
तेव्हा हे वृथा सामाजिक दबावाचं जोखड धुडकावून तुम्ही अशा चार भिंतींंआडच्या काव्याला असं मोकळं वावरावर आणावं अशी तुम्हाला विनंती.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2016 - 9:38 am | अत्रुप्त आत्मा

स्व-रूपाला दुजोरा दिल्याबड्डल हार्डिक हबिनंदण्ण! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-047.gif

प्रचेतस's picture

23 May 2016 - 9:41 am | प्रचेतस

चालू दया अता निरर्थक अत्मकुंथन

चौकटराजा's picture

23 May 2016 - 9:55 am | चौकटराजा

गुर्ज्रीनी अत्यंत दुरलक्षित, उपेक्षित विषयाला काव्य विषय केला ते त्यांचे महत्कार्य विसरून जाता काय हो अभ्यासू ? आँ ?
नुसते आम्ही फ्याण आहोत असे म्हणू नका . बुवांचा एखाद्या वावराकाठी सत्कार तरी करा !

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2016 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा

@चालू दया अता निरर्थक अत्मकुंथन ››› तेच केलत नकळत तुम्हीही(ह्ही ह्ही! ) .. . =)) धन्यवाद!

वपाडाव's picture

8 Jun 2016 - 5:15 pm | वपाडाव

हार्डिक
गुर्जी लय जोरात सुटलेत...! आवरा त्यांना...

खटपट्या's picture

23 May 2016 - 8:58 am | खटपट्या

वा, अत्यंत सामाजिक शिघ्र कविथा.

सस्नेह's picture

23 May 2016 - 9:45 am | सस्नेह

अच्चं झालं होय !

प्रसाद गोडबोले's picture

8 Jun 2016 - 12:43 pm | प्रसाद गोडबोले

हायला

ही भारीच कविता होती बे अभ्या !

खुपच सुरेख :)