परीकथेची सव्वा दोन वर्षे - भाग ९
३ जून २०१६
जेव्हा केव्हा रस्त्याने येता जाता आम्हाला डॉगी दिसतो .. अर्थात मुंबईच्या रस्त्यावर दर चौथ्या पावलावर कुत्रे दिसतेच .. तेव्हा त्याला बघून परीची बडबड अशी असते,
"मम्मा भूभूऽऽ ...
मम्मा भूभूला घाबरते
माऊ भूभूला घाबरते
अर्चू माऊ भूभूला घाबरते
अप्पू माऊ भूभूला घाबरते ..
परी भूभूला घाबरत नाही
.
.
(कारण...)
....
...
..
परीचे पप्पा भूभूला फाईट देतात :)
फिलींग सुपर डॅड .. :)
(फक्त भूभूला आमची भाषा समजत नाही हे माझे नशीब!)
.
.
६ जून २०१६