✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नात्यातले लुकडे जाडे

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 20:45  ·  लेख
लेख
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का जाड्यांनी लुकड्यांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लुकड्यांना जाडे होऊन जाड्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते" वजनाने लुकडे असल्याचा प्रत्येक नात्यात गॆरफायदा घेतला जातो. "हा नियम सगळ्या नात्यांना सारखाच लागू होतो" मग ते कोणतेही नाते असो: पिता-पुत्र, पिता-पुत्री, सासरे-जावई, सासू-सून, पती-पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहीण-बहीण, नणंद-भावजय, मेहुणा-साळा. आणि याला कारणीभूत असते परंपरागत चालत आलेली अंधपणाने पाळली जात असलेली जाड्यांना बळीचा बकरा बनवणारी दांभिक शिकवण. मान आणि मोठेपणा न देता कर्तव्याची अपेक्षा कशी बरे करणार? आणि जाड्यांची आज्ञा पाळायची वेळ लुकड्यांवर आली की जर का असा विचार समोर येत असेल की "जमाना बदलला अाहे आता. कसले जाड आणि कसले लुकडे? सर्व समान! ज्याचा अनुभव महान तो जाड!" मग जर असे असेल तर मग कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. पण वरिल सर्व नात्यातील जर लुकडे हे जाड्यांना योग्य मान देत असतील आणि आज्ञा पाळत असतील तर ते नाते अधिक दृढ होते यात शंकाच नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6143 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

मोड ऑन- काहि हं श्री-मोड ऑफ.

जेपी
गुरुवार, 09/03/2015 - 20:50 नवीन
मोड ऑन- काहि हं श्री-मोड ऑफ. अवांतर-जिलब्या टाकायच बंद करा.
  • Log in or register to post comments

मोड येणे

कपिलमुनी
Fri, 09/04/2015 - 14:58 नवीन
यावरून मोड येणे हा वाक् प्रचार आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

लॉरेल एंड हार्डी च विडंबन आहे

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/04/2015 - 15:40 नवीन
लॉरेल एंड हार्डी च विडंबन आहे का हे? (गोंधळलेला) बाप्या
  • Log in or register to post comments

आलं लक्षात ...

गामा पैलवान
Fri, 09/04/2015 - 22:22 नवीन
जाडे = हिंदू लुकडे = ओळखा पाहू! -गा.पै.
  • Log in or register to post comments

१. जाड़े - यूरोपियन

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/05/2015 - 08:56 नवीन
१. जाड़े - यूरोपियन लुकडे - सीरियन पोरगे २. जाड़े - ठोकणारे ऑस्ट्रेलियन लुकडे - ठोकले जाणारे भारतीय ३. जाड़े - आपण मराठी लुकडे - उत्तर भारतीय ४. जाड़े - तमिळ लोक लुकडे - नॉन तमिलियन जनता गापै , कितीतरी जोड्या लावता येतील मला वाटते दर वेळी "हिंदु-????" करण्यात काही हशील नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे भूलचूक माफ़ी (सेक्युलर अन कदाचित तुमच्या भाषेत सिक्युलर) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बापरे! काय चाललंय हे? मी हे

श्रीगुरुजी
Sat, 09/05/2015 - 12:43 नवीन
बापरे! काय चाललंय हे? मी हे विडंबन गंमत म्हणून लिहिलं तेव्हा मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काही जण हे गांभीर्याने घेऊन थेट हिंदू-अहिंदू, मराठी-उत्तर भारतीय असा संबंध लावतील ते. आता विडंबन सुद्धा समजावून सांगायची वेळ आलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून...

गामा पैलवान
Sun, 09/06/2015 - 12:27 नवीन
श्रीगुरुजी, लेखनप्रकार आणि लेखनविषय पाहून अंदाज आला होता की ही गंमत असणारे. म्हणून मीही थोडी गंमत केली. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ऑ?

भीमराव
Sat, 09/05/2015 - 08:41 नवीन
'वजनाने लुकडे' ? लुकडे वजनाने असतात का आकाराने?
  • Log in or register to post comments

कर्तव्य आणि हक्क सुद्धा

श्री गावसेना प्रमुख
Sat, 09/05/2015 - 09:10 नवीन
कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. बारके लोक नेहमी कर्तव्य नाकारतात आणी हक्क मागतात।है क्या नही
  • Log in or register to post comments

नात्यातले कधीकाळी लुकडे

मनीषा
Sat, 09/05/2015 - 20:03 नवीन
नात्यातले कधीकाळी लुकडे असलेले जाडे .. असाही एक लेख येऊ शकेल .. :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा