आङळे वाङळें साहित्य संमेलन

आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

लेखनविषय:
लेखनप्रकार
50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ... काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच. चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते. माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते.

एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022

लेखनविषय:
लेखनप्रकार
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो... 2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत... पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही. मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न .... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...

१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

लेखनविषय:
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन.... "सव्वापाच करोड"!!! क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो..... आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट. मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार...

फोन

लेखनविषय:
लेखनप्रकार
"आरे पत्त्या कुठाय तुजा‌.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?" हॅलोs ? कोण ? "बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?" नाय रे.. आवाज नाय ओळखला मी. "आरे पवन बोलतोय पवन.!" पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख लागली नाय रे आजून. "पवन जाधव बोलतो. पळशीवरनं." आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..? "काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? " हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत. "आरं पन आसं कुटं आस्तंय गा ? एवडं करूनी लगा.. एवडं कुटं तोडत आस्तेत गा?

जेथोनि सुरुवात होते..

लेखनप्रकार
तर तेव्हा समजा शाळेत वगैरे जावं लागत असलं आणि अभ्यास वगैरे असला तरीही आम्हाला अगदीच काही कंदीलाच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण दुर्दैवाने त्या गावात आधीच लाईट आली होती..! त्यामुळे "आम्ही कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते. तर जन्मदाते म्हणाले की,''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. उगा पांदीवगळीतनं खेकडी हुडकत फिरण्याबगर हितं बसून तरी दुसरं काय करनार हैस तू ?'' सवाल बिनतोड होता. आणि माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं.

(स्वप्ना, जागृती, सीमा)

स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

प्रेमअगन..!

प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

लेखनविषय:
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत. तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा. १. बिग बँग थियरी (BBT) सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली.

बखरीतून निसटलेलं पान..

लेखनविषय:
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..
Subscribe to मौजमजा