✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

स
संपादक मंडळ यांनी
Sat, 11/02/2013 - 05:16  ·  लेख
लेख
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात. आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्‍या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत. आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
280287 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण

मदनबाण
Sun, 11/03/2013 - 00:55 नवीन
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.
  • Log in or register to post comments

आमचं स्पर्धेसाठी नावं घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/03/2013 - 13:50 नवीन
ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)
  • Log in or register to post comments

कित्येक प्रकार

पैसा
Sun, 11/03/2013 - 18:38 नवीन
कोणताही प्रकार चालेल की! पारंपारिक, फुलांची, पाण्यावरची, गालिचा, संस्कार भारती काही चालेल की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डीजीटल रंगोली चालेल काय?

अभ्या..
Sun, 11/03/2013 - 20:52 नवीन
डीजीटल रंगोली चालेल काय? वाटल्यास त्याचा प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढणार आहे ती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अभ्या लग्नही डीजीटली करणारे

पाषाणभेद
Sun, 11/03/2013 - 21:28 नवीन
अभ्या लग्नही डीजीटली करणारे का रे ? :-) (मी पुढे काय बोललो? नाय बा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाही म्हणजे "प्रिण्ट आउट

पाषाणभेद
Sun, 11/03/2013 - 21:29 नवीन
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

उत्तर जरा अवघड है

पैसा
Mon, 11/04/2013 - 09:17 नवीन
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शंका

अभ्या..
Mon, 11/04/2013 - 15:05 नवीन
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धान्य, फुलं

पैसा
Mon, 11/04/2013 - 15:22 नवीन
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा

पाषाणभेद
Tue, 11/05/2013 - 05:46 नवीन
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कुणी किती रांगोळ्या

मृत्युन्जय
Sun, 11/03/2013 - 21:26 नवीन
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी Image removed. Image removed. Image removed. अर्धांगाने काढलेली रांगोळी Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत दोन्ही रांगोळी.

त्रिवेणी
Mon, 11/04/2013 - 16:31 नवीन
मस्त आहेत दोन्ही रांगोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मस्त

यशोधरा
Wed, 11/06/2013 - 07:29 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

रांगोळीचा फोटो टाकता येत नाहीये.

माशा
Sun, 11/03/2013 - 23:39 नवीन
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाच्या मुख्य चौकोनाच्यावर

पैसा
Sun, 11/03/2013 - 23:52 नवीन
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माशा

हुश्श ! एकदाचा अपलोड झाला रांगोळीचा फोटो.

माशा
Mon, 11/04/2013 - 00:44 नवीन
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत रांगोळ्या!

यशोधरा
Mon, 11/04/2013 - 05:27 नवीन
मस्त आहेत रांगोळ्या!
  • Log in or register to post comments

आम्ही स्पर्धक नाही. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/04/2013 - 08:24 नवीन
Image removed. अगोदर सांगितलं असतं तर अजून भारी काढली असती. इत्यादी इत्यादी. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अजून २ दिवस आहेत की!

पैसा
Mon, 11/04/2013 - 09:04 नवीन
मी तर ४ दिवस रोज नवी रांगोळी काढते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/04/2013 - 09:13 नवीन
सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त आहेत!

अनन्न्या
Mon, 11/04/2013 - 15:54 नवीन
पण आमच्याकडे यावर्षी दिवाळी नाहीये, त्यामुळे स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
  • Log in or register to post comments

मस्त मस्त रांगोळी आहेत

त्रिवेणी
Mon, 11/04/2013 - 16:32 नवीन
मस्त मस्त रांगोळी आहेत सगळ्यांच्या.
  • Log in or register to post comments

मस्तं रांगोळ्या !!

सानिकास्वप्निल
Mon, 11/04/2013 - 16:39 नवीन
हि माझी रांगोळी :) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर

माझीही शॅम्पेन
Tue, 11/05/2013 - 14:56 नवीन
आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे

सानिकास्वप्निल
Tue, 11/05/2013 - 20:49 नवीन
तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

कृ ह घ्या !!

केदार-मिसळपाव
Tue, 11/05/2013 - 21:45 नवीन
हा हा हा, आता काय त्या लाकडी जमिनी शेणाने सारवुन त्यावर रांगोळी काढावी कि काय ह्या माउल्यांनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

हा हा हा ... तस नाही ,

माझीही शॅम्पेन
Tue, 11/05/2013 - 23:41 नवीन
हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

अजून एक रांगोळी

सानिकास्वप्निल
Tue, 11/05/2013 - 21:44 नवीन
आज काढलेली रांगोळी देतेय :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

__/\__ अप्रतिम रंगसंगती.

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/06/2013 - 00:11 नवीन
__/\__ अप्रतिम रंगसंगती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

सानिका, सगळ्या रांगोळ्या

यशोधरा
Wed, 11/06/2013 - 07:30 नवीन
सानिका, सगळ्या रांगोळ्या आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

गेल्या वर्षी दिवाळीला

सानिकास्वप्निल
Fri, 11/08/2013 - 12:45 नवीन
गेल्या वर्षी दिवाळीला काढलेली रांगोळी :) Image removed. हळद - कुंकू वापरून काढलेली गणेशाची रांगोळी :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

अप्रतिम..

पिशी अबोली
Fri, 11/08/2013 - 14:00 नवीन
अप्रतिम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

गणपतीची रांगोळी खूप आवडली.

यशोधरा
Sun, 11/10/2013 - 13:35 नवीन
गणपतीची रांगोळी खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

खूप छान

राजमुद्रा२१
Tue, 11/12/2013 - 08:07 नवीन
खूप छान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

मस्त मस्त रांगोळ्या...

पिशी अबोली
Mon, 11/04/2013 - 19:31 नवीन
मस्त मस्त रांगोळ्या... :)
  • Log in or register to post comments

सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत.

किलमाऊस्की
Tue, 11/05/2013 - 02:41 नवीन
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' Image removed. या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच रांगोळी..

ह भ प
Tue, 11/05/2013 - 21:44 नवीन
अप्रतिम.. सुप्पर लाईक.. कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

धन्यवाद!

किलमाऊस्की
गुरुवार, 11/07/2013 - 03:02 नवीन
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

दुसरी रांगोळी खूप आवडली.

यशोधरा
Wed, 11/06/2013 - 07:30 नवीन
दुसरी रांगोळी खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

कोलम आवडली

सूड
गुरुवार, 11/07/2013 - 18:21 नवीन
कोलम आवडली, साधी सुटसुटीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

फारच सुरेख!

राजमुद्रा२१
Tue, 11/12/2013 - 08:08 नवीन
फारच सुरेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

मावश्या आणि आईने काढलेली

पुष्कर जोशी
Tue, 11/05/2013 - 09:25 नवीन
Image removed. मावश्या आणि आईने काढलेली रांगोळी पाण्या मुळे जरा.. Image removed. आते बहिणीने काढलेली रांगोळी
  • Log in or register to post comments

यंदा सिंगापोर मध्ये हवे तसे

मनुराणी
Tue, 11/05/2013 - 09:46 नवीन
यंदा सिंगापोर मध्ये हवे तसे रंग न भेटल्याने आणि दीड वर्षाचे कन्यारत्न मदतीला असल्याने छोटीशी न छान रांगोळी. Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख सुरेख रांगोळ्या आहेत.

मनीषा
Tue, 11/05/2013 - 16:07 नवीन
सुरेख सुरेख रांगोळ्या आहेत.
  • Log in or register to post comments

सर्व रांगोळ्या रेखीव आहेत.

केदार-मिसळपाव
Tue, 11/05/2013 - 21:45 नवीन
असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी

केदार-मिसळपाव
Wed, 11/06/2013 - 00:58 नवीन
रांगोळीतला पांढरा रंग म्हणजे मीठ आहे. इतर रंग हे संस्कार भारतीचे रंग नसुन उपलब्ध असणारा रंगीत दगडी चुरा आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

क्लास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/06/2013 - 09:02 नवीन
आवडली रांगोळी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/07/2013 - 17:51 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

सुबक आहे !!

सूड
गुरुवार, 11/07/2013 - 19:46 नवीन
सुबक आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

अजब गजब भारीच रांगोळी

लौंगी मिरची
गुरुवार, 11/07/2013 - 22:27 नवीन
अजब गजब भारीच रांगोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा