काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.
नादमय सरसर
कोवळ्याशा वाटेवर
कोवळ्या सहा पायांची
चाल होई भरभर
एकामागे दुजा चाले
पुढचे न पाहताना
पुढच्याचे ध्यान नाही
पुढे पुढे चालताना
कधीतरी भांबावून
पुढचा जागी थिजतो
हरवल्या मागच्याला
चार दिशांत शोधतो
मागलाही नकळत
गेलेला पुढे जरासा
थबकून तोही टाके
पुढच्यासाठी उसासा
क्षणातच पुन्हा होई
नजरेत त्यांची भेट
हुश्श मनात करूनि
चालू पुढे त्यांची वाट
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५)
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !"
कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली
नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली
हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली
पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली,
"कृबुवरती स्तुतिसुमने उधळीत होऊ नको दंग
कारण विरहित कार्य कधीतरी असते का सांग ?
असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया
नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)"
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना.
आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं. आणि अशी दुर्दैवी घटना घडते.
- मिपाकर प्राडॉ
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे?
विज्ञानाचे नियम तोकडे-
विपरित त्यांच्या घडते आहे
भवताला घोटात गिळुनिया
कृष्णविवर हे हिंडत आहे
"विझत्या सूर्यावरती लट्टू
नार नवेली पृथ्वी आहे"
कृष्णविवर संतप्त होऊनी
अथक स्वतःला कोसत आहे
चार भिडू डावे
उजवेही चार
कुंपणाच्या वर
दोन भिडू
भिडू भिडतात
त्वेषे परस्परा
मौज ही इतरा
फुकटची
राजकारणाच्या
व्यतिरिक्त काही
घडतची नाही
देशात ह्या
ऐसा आविर्भाव
भिडू बाळगती
आता झाले अती
हौस फिटे
हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक
हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव
हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव
हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे
हे पालक मंत्र्या,
महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले
"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"
असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना
आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?
अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
इंटरनेट हाती | असताना !
हाती जे येईल | फॉरवर्डावे तेच
पुढच्यास ठेच | लागेना का
वायफळ मळे | पिकवू अमाप
काळाची झडप | येवो सुखे
(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका
सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . )
------------------------------
पंच्याऐंशीतला तरुण उभा माझ्या समोर ताजा !
पंचेचाळीशीतला बसलेला मी, अन् गुडघा दुखतो माझा !
त्या वेळचं हवा पाणि, अन् त्यांनी खाल्लेलं अन्न ताजं !
आणि प्रिझर्वेट पिझ्झा बर्गरवर फुगलेलं पोट माझं !
बडीशोप काही गोड नाही,
ती फार मोठी खोडंही नाही .
तंबाखू सारखी वाट लावणारी,
ती सर्वांगिण ओढंही नाही .
हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही !
तशी ही सोपी आहे
साध्या सहज स्वभावाची
कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम
जो हातावर घेइल , ती त्याची !
आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ?
अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय !
आय आय आय !
आला ना आवाज आतून ?
हाय हाय हाय !
भाजला ना गाल त्यातून ?