मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन
- 53 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर.
.........................
इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते.