माध्यमवेध

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 12:56 am

मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear)
मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting)
मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation)
मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech)

वावरसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद हवा विसंवाद नको

अनिकेत एस जोशी's picture
अनिकेत एस जोशी in जनातलं, मनातलं
12 Mar 2016 - 8:44 pm

राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पहिला आठवडा तीन दिवसातच समाप्त झाला. 9 मार्चला सुरु झालेल्या या अधिवेशनाचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत दाखवण्यात आले आहे. तसे पाहिले तर हे अधिवेशन चक्क चाळीस दिवस चालेल असे म्हणावे लागेल. पण प्रत्यक्षात कमाचे दिवस आहेत फक्त तेवीस!! दि. 17 एप्रिल पर्यंतचे अधिवेशन असे दाखवलेले आहे, पण त्यात दि. 13 एप्रिल नंतर साऱ्या सुट्याच आहेत. पहिला आठवडा तीन दिवसातच संपल्या नंतर पुढचा, म्हणजे दुसरा सप्ताह, हा कामाकजाच्या पूर्ण पाच दिवसांचा आठवडा आहे. त्या नंतरचा तिसरा आठवडा पुन्हा तीन दिवसांचा आहे.

समाजमाध्यमवेध

नारायण

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 5:15 pm

वॉट्सपवर सकाळी सकाळी निलेशचा गुडमॉर्निंगचा मेसेज. च्यायला लावतय आता कामाला.
सकाळपासून आहेस का? आहेस का? असे चारदा विचारुन साहेबांची स्वारी संध्याकाळी ऑफिसात अवतरते. फॉर्मलपणाचा कळस असे कपडे, एका हातात डायरी कव्हर चढवलेले आयपॅड, दुसर्‍या हातात रेबॅनचे डबडे अन अजून एक आयफोन घेऊन शूज कसे काढावे हा विचार करीत नुसताच उभा.
"अरे ये की तसाच" म्हणेपर्यंत साहेब खुर्चीवर बसलेले असतात.
हा निलेश. इव्हेंट मॅनेजर. हा फक्त कंपन्याच्या साहेबांना मॅनेज करतो असे आम्हा सर्व अ‍ॅडव्हर्टायझर लोकांचे मत.
"येर्टेलचे प्रिमीयम लाँच आहे. करतोस का?"
"काय काय घेतलास?" मी मुद्द्यावर

मांडणीमाध्यमवेध

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
7 Mar 2016 - 7:52 am

परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा -----

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भचौकशीमदत

भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
3 Mar 2016 - 5:09 pm

कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्‍वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>>

समाजमाध्यमवेध

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 3:36 pm

अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.

नृत्यनाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयविडंबनव्युत्पत्तीऔषधोपचारभूगोलराहती जागाक्रीडाफलज्योतिषसद्भावनाआस्वादमाध्यमवेधप्रश्नोत्तरेमदतभाषांतरविरंगुळा

प्रेम !!! ???

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 8:20 pm

प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण!

आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो.

मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला.

वावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखप्रतिभाविरंगुळा

संदर्भ मूल्याचा प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
29 Jan 2016 - 10:25 pm

काही वेळा काही लोक अशी माहिती, मुद्दे आणि तर्क आणि अजब निष्कर्ष घेऊन येतात की त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळीसुद्धा दोन क्षण स्तंभीत होऊन जावीत, मग संदर्भ मागीतले जातात संदर्भ दिले गेलेच तर कुठलेसे संदर्भ अचानक समोर ठेवले जाताना दिसतात पण त्यांची विश्वासार्हता आणि तर्कसुसंगतता प्रथम दर्शनी साशंकीत असण्याची शक्यता असू शकते. विज्ञान, समाजशास्त्रे आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील माहिती आणि सांख्यिकी बाबत हे बरेच होताना दिसते.

मांडणीतंत्रसमीक्षामाध्यमवेधमाहितीसंदर्भ

मिस करू नये असे टीवी कार्यक्रम

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
25 Jan 2016 - 6:35 pm

आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात.

पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे,

हे ठिकाणप्रकटनविचारआस्वादमाध्यमवेधबातमीमाहिती

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
23 Jan 2016 - 1:30 pm

काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं. का.) आधार घेऊन ग्राहक मंचाचे दार ठोठावतो आणि रेल्वे खात्याकडून झालेल्या मनःस्तापाबद्दल आणि गैरसोयीबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल करतो .

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचारमाध्यमवेधलेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीमदत