खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 5:33 pm

शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :)
'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग,
तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते.

या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार
लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली.
आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :)

सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा. सिरेलचे एक वेगळेपण
म्हणजे त्याचे टायटल मोन्टाज, यात सॅण्ड आर्ट अर्थात वाळू वापरून निर्मित केलेली कला आहे, त्यातून सिरेलच्या
कथानकाचा साधारण अंदाज येतो. शीर्षकगीत एकदम अभिनव, प्रेक्षणीय, श्रवणीय झाले आहे,

तर अशी ही एक सर्वांगसुंदर मालिका झी मराठीने प्रेक्षकां (चा अंत पाहण्या) साठी आणली आहे. सिरेलचे ट्रेलर
पाहिले तेव्हापासूनच उत्सुकता होती, कारण होते नवीन, सुंदर, समंजस, प्रगल्भ (वाटणारे) नायक नायिका,
वेगळे वाटणारे कथानक. तेच ते सास बहू अन घरातल्या घरात कट-कारस्थानं दाखवणार्‍या सिरेलांतून हा
काहीतरी सुखद बदल वाटत होता म्हणून पाहण्याचे ठरवले. अजून काही सांगता येत नसले तरी सिरेल याच
ट्रॅकने पुढे जात राहिली तर मात्र हा समज चुकीचा ठरण्याची चिन्हे जास्त दिसतायत.

k3

सुरूवातीच्या काही भागांत, लग्नाच्या वेळी प्रेग्नंट असणारी नायिका, अन हे लग्नाच्या दिवशीच समजणारा
डॉक्टर नायक दाखवल्यामुळे हे काहीतरी वेगळेय असे वाटले, पण ते वेगळे म्हणजे टोटली अनबिलीव्हेबल असणार
हे आता लक्षात येते आहे, जसजसे दिवस जात आहेत, literally. खी खी खी :)

मालिकेत नक्की खुळे कोण याची यादी करायची झाल्यास बाकी कुणी शिल्लक राहील का याबद्दल शंका आहे.
पहिली नायिका नं १, तिला आपण M1 म्हणू, शॉर्टफॉर्म यु नो.
तर ही एकदम सालस मुलगी ३ महिन्यांची प्रेग्नंट आहे, तिचं लग्नही लागतंय तरी तिला या गोष्टीचा पत्ताच
नाहीय, इतकी निष्पाप. वर त्या होणार्‍या बाळाचा पिता कोण हेही तिला ठाऊक नाही हा तर निरागसतेचा कळस..

m1

डॉक्टर नवरा सप्तपदीच्या वेळेस तिचा हात धरतो तेव्हा ती प्रेग्नंट आहे हे त्याला कळतं. ही गोष्ट तो तिला नंतर
सांगतो, त्यावर ही बया वर तोंड करून न पटेलशी स्पष्टीकरणंही देते. इज धिस इव्हन पॉसिबल..

(आमच्या डॉक्टर बंधूराजाला विचारलं, असं असतं का, तर उलट मला म्हणे, ती सिरेल आहे, असं असतं का :(
तरी तो इथे नाही म्हणून बरं, नाहीतर सिरेल मध्ये समोरचा जे बोलेल, त्याची शाब्दिक चिरफाड करून पूर्णवेळ
रनिंग कॉमेंट्री ऐकवणार, हे म्हणे डॉक्टर. असो. हा विषय 'आपले घर: एक प्राणीसंग्रहालय' या लेखमालेसाठी
राखून ठेवण्यात आलेला आहे.)

दुसरा स्वतः नायक, डॉक्टर V , ज्याला लग्नाच्या दिवशी आपली बायको प्रेग्नंट आहे हे कळतं, तरी तो एक
लाडकी आत्या सोडून हे बाकी कुणाकुणाला सांगत नाही, का तर स्वतःच्या आयुष्याची सोडून, त्याला इतर सर्वांची
काळजी. त्यागी परोपकारी महात्मे या भूतलावर असल्याचे हा मूर्तिमंत उदाहरण. एवढा गोंडस, समंजस नायक
कायम उदास राहतो ते अगदीच बघवत नाही. त्याला कोणीतरी गदागदा हलवा, जागे करा असं वाटत राहतं.

कथानक पुढे सरकतेय तसतसा हा माणूस अजून अगम्य वागत चाललाय. का तर म्हणे बायकोच्या आधीच्या
प्रकरणातून जन्मणार असलेल्या बाळाला आपले नाव देऊ असे वचन त्याने त्या दिवट्या बायकोला दिलेले असते.
शिवाय त्या डबल M ना आईवडिल नसतात, मग त्यांचा सांभाळ करणार्‍या त्यांच्या वयोवृध्द आजी आजोबांना
कुठलाही धक्का द्यायचा नाही म्हणे. अरे पण त्या दिवटीला लहानपाणापासून ओळखणार्‍या त्यांना तिचे
(उधळलेले) गुण अजून माहित नसतील हे शक्य आहे का ?? अरे देवा, व्हॉट्स गोइंग ऑन रे बाबा .. !!

तर त्यासाठी तो खोट्यावर खोटे बोलत रहतो. तेही आपल्या घरच्यांसमोर, मुख्य म्हणजे आजीसमोर जी घर
मातृसत्ताक पद्धतीने चालवत असते, संपूर्ण घरात जिच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत नसते आणि
महत्वाचे म्हणजे, जिला खोटे बोललेले अजिबात चालत नसते म्हणे.

तिसरी, M1 ची बहिण, M2, MBBS करणारी, अर्थात अभ्यास, कामबीम सोडून बाकीचं सगळं करतांना दिसणारी.
ही आहे मात्र गोड, सुंदर, मुख्य म्हणजे प्रगल्भ, अशा नायिका फार कमी असल्यामुळे तिला सगळं माफ :)

m2

आपल्या बहिणीच्या चुका, आतताईपणा सगळे दिसतेय पण ती काही करू शकत नाही, V ला सपोर्ट करणे सोडून.
पुढेमागे हिची आणि V ची जोडी जुळणार, ते कसे हा कथानकाचा मुख्य भाग. तो येईपर्यंत रामा, शिवा, गोविंदा..

बाकी आजीबद्दल काय बोलावं, दुसर्‍यांच्या चूका काढतांना आपण स्वतः किती चुकतोय याकडे सपशेल दुर्लक्ष
करणारी. कुठल्याही गोष्टीची व्यवस्थित शहानिशा न करता सगळ्या घरावर केवळ आपला दरारा आणि हुकूमशाही
चालवणे हा हिचा मुख्य उद्योग.

मग V ची आई, अर्थात कधी किचन न सोडणारी, सोशिक, कनवाळू, मायाळू, उठसूठ अगंबाई, अगंबाई !!
आणि मी आलेच हं.. हे हिचे पेटंट शब्द. V चुकलाय असे समजून त्याच्याशी बोलण्यावर बहिष्कार टाकायला
लावणार्‍या सासूसमोर काही न बोलणारी, उलट तिच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडणारी.

बाकी V चे पिताश्री, काकाश्री, काकूश्री इतर, सगळे एका माळेचे मणी, कुणालाच कसले प्रश्न पडत नाहीत,
पडले तरी ते सोडवत नाहीत, तसं तर तसं, मम म्हणणारे. एक फक्त आत्या आहे, तीही डॉक्टर आहे,
जिला V ने लग्नादिवशीच हा प्रकार सांगितलाय, ती त्याच्या बाजूने आहे, तिलाही हा अन्याय अजिबात पटत नाही,
अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही.

स्वतः धडाधड चुका करून वर घरच्यांच्या डोक्यावर मिरे वाटणारी नायिका, सोशिक त्यागमूर्ती नायक, हे सर्व
नुसतेच बघत राहणारी अजून एक नायिका, असे सगळे मिळून जीव नकोसा करतात.
कालच्या भागात तर टेबलाच्या एका बाजूला V अन दुसर्‍या बाजूला M2, असे दोघे दोन्हीकडे मूकपणे टिपे
गाळतायत, तेही तिसर्‍याच्या चुकीसाठी, असे दृश्य. ते बघून दोघांनाही समुद्रात एक डुबकी मारून, नाकातोंडात
पाणी जाईपर्यंत, श्वास कोंडेपर्यंत तसेच ठेवावे आणि जरा डोकं असल्यासारखे वागाल का नाही असे विचारावे,
हो म्हटल्यावरच बाहेर काढावे असे वाटले.

सिरेलच्या निर्माता दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या डोक्याचा पार भुगा होईल, सहनशक्तीला सुरुंग लागतील, याची
पुरेपूर काळजी घेतलीय. ही सर्व सर्कस पाहून त्या गरीब, सोशिक प्रेक्षकाला मात्र जोरात ओरडावंसं वाटतं,
"अरे काय हे... असं कुठे असतं का ?? तुम्हाला कुणालाच मेंदू नावाची गोष्ट नाहीय का, आणि असेल
तरी त्याचा वापर करायचाच नाही असे ठरवलेय का..??

ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी,
अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही,
कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी.
तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!

संस्कृतीबालकथाराहणीऔषधोपचारराहती जागागुंतवणूकफलज्योतिषराजकारणमौजमजाविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादमाध्यमवेधअनुभवचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

30 Sep 2016 - 5:45 pm | महासंग्राम

त्या हिरवनीला गालावर गोग्गोड खळी पडते, त्यामुळे अभ्यास वगैरे सर्व माफ, बाकी सगळे डोक्यात बाद प्रकार आहे.

हायला, नुसत्या खळीपायी सगळं माफ असतय व्हय. भारीच की.
आम्हाला कोण नाही माफ करत. :(

पाटीलभाऊ's picture

30 Sep 2016 - 7:13 pm | पाटीलभाऊ

अहो...तुमची खळी गोग्गोड नसेल कदाचित...!
बाकी ती हिरवनी...मग पार्शिलीटी तर व्हनारच ...!

हम्म. सलूनवाला पण तक्रार करतो. शेव्हिंग जमत नाहि ;)

ढाढी करावीच कशाला म्हणतो मी ..

अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे ..

आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

महासंग्राम's picture

1 Oct 2016 - 10:27 am | महासंग्राम

मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा's picture

30 Sep 2016 - 5:50 pm | पैसा

असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू.

नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत.

खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

संजय पाटिल's picture

30 Sep 2016 - 6:18 pm | संजय पाटिल

!@#$% शिरेलीच्या...
कशाला बघून डोक्याला शॉट लावून घेताय?

पैसा's picture

30 Sep 2016 - 6:22 pm | पैसा

नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

राष्ट्रभाषेतला चालेल का
पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे.....
७९९ का बेल्ट पहना अब
म्म्म्म्म्म्म्म्म्म........
एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

पैसा's picture

30 Sep 2016 - 6:55 pm | पैसा

=))

अद्द्या's picture

1 Oct 2016 - 12:27 pm | अद्द्या

कार्टून नेटवर्क ??

पण त्यात हि आजकाल राम राहिला नाही ..

कुठे ते dragon ball z आणि swat cats.. कुठे आत्ताची झुरळं .

तेजस आठवले's picture

30 Sep 2016 - 6:31 pm | तेजस आठवले

नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली

हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

पामर's picture

3 Oct 2016 - 3:25 pm | पामर

एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

मारवा's picture

30 Sep 2016 - 5:58 pm | मारवा

लय मजा येणारे
या धाग्याचे प्रतिसाद वाचतांना.
उत्सुकता शिगेला.....

रेवती's picture

30 Sep 2016 - 6:03 pm | रेवती

सगळे मान्यच!
शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते.

"अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

मारवा's picture

30 Sep 2016 - 6:16 pm | मारवा

नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे
पण
विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे.....
किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते
आता भेदरलेला बोका
थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर
झर्र्क्कन
मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल
नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

आदूबाळ's picture

30 Sep 2016 - 6:25 pm | आदूबाळ

लोल! माझं एक जाऊदे. आज्जींच्या वयाचा तरी विचार करा हो!

फॅमिली धागा आहे
विसरलोच होतो.

नाखु's picture

1 Oct 2016 - 8:40 am | नाखु

"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात"

मामो ऑफ

पैसा's picture

30 Sep 2016 - 6:12 pm | पैसा

पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का?

नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

महासंग्राम's picture

30 Sep 2016 - 6:15 pm | महासंग्राम

झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

बघणेबल
थोडासा एडिबल च्या जवळ वाटतो.
म्हणजे खाण्याजोगा.

आनन्दिता's picture

30 Sep 2016 - 7:28 pm | आनन्दिता

ते खाणेबल असं आहे.. बे

मयुरेष's picture

30 Sep 2016 - 11:54 pm | मयुरेष

Z युवा बरा वाटतोय.

मयुरेष's picture

1 Oct 2016 - 12:01 am | मयुरेष

वेड लागायचं बाकी आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Sep 2016 - 6:15 pm | माम्लेदारचा पन्खा

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे...

कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा....

कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड....

नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो.
त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय.
एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला?
आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

महासंग्राम's picture

30 Sep 2016 - 6:30 pm | महासंग्राम

तुमच्या लेकाच्या क्रश साठी + 111111

मारवा's picture

30 Sep 2016 - 6:53 pm | मारवा

एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

तो फिर बात पक्की समझु ?

समजा समजा.मला लवकर सून येईल.मग गायडन्स म्हणून मी शिरेली बघेन.

नाखु's picture

1 Oct 2016 - 8:46 am | नाखु

सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल.

भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

अजया's picture

1 Oct 2016 - 9:13 am | अजया

=))))

गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात
उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे )
तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है.
त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.
हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही
आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच
नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो।

ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

नीलमोहर's picture

1 Oct 2016 - 3:52 pm | नीलमोहर

' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है.
त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.'

- आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण.
त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण
ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे?
.
दुदुदुदुदुदुदुदुद

नीलमोहर's picture

1 Oct 2016 - 3:56 pm | नीलमोहर

रेड एफेम वर ऐकूयात हे ऑल टाईम हिट्ट गाणं,

' जळणेवाले तो जळते रहेंगे,
हाथों को अपने मळते रहेंगे..'

मी चुकुन 'हाथीको अपने मळते रहेंगे' वाचले. ;)

माजी आवडती २० सीरीयल्स पेक्षा काय वाईट जिलबी आहे. असलीच जिलबी तर अफगाण आहे.

मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते.

मी पहावे तू दिसावे
पारणे या मनाचे फिटेना
अंतरीची अंतरे ही
का तरीही सारी मिटेना

हीच प्रीती, हीच भीती
वीण दोघांतली ही तुटेना
हेच कोडे रोज थोडे  
सोडवावे तरीही सुटेना

आस मुकल्या जीवनाची
आज खुलता कळी ही खुलेना
वाट चुकल्या या मनाची 
आज खुलता कळी ही खुलेना

अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

रातराणी's picture

30 Sep 2016 - 10:44 pm | रातराणी

खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये.
शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे's picture

30 Sep 2016 - 7:29 pm | सतिश गावडे

बरं झालं मी टीव्ही पाहत नाही.

आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले's picture

30 Sep 2016 - 9:00 pm | रमेश आठवले

अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१'s picture

30 Sep 2016 - 9:35 pm | मन१

भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.

ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी,
अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही,
कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी.
तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!

ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2016 - 12:06 am | टवाळ कार्टा

तुमच्या दुःखात सहभागी आहोत, बाकी लेख मस्तय

पद्मावति's picture

1 Oct 2016 - 12:42 am | पद्मावति

मस्तं लेख :)
आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे

आँय??
एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

महासंग्राम's picture

1 Oct 2016 - 9:24 am | महासंग्राम

ozee.com वर भाग असतात या शिरेलींचे तिथे चेक करा

अरुण मनोहर's picture

1 Oct 2016 - 4:49 am | अरुण मनोहर

माकडिणीच्या हातात हिरा

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2016 - 9:08 am | पिलीयन रायडर

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

पैसा's picture

1 Oct 2016 - 4:39 pm | पैसा

तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

हिरवीण म्हणजे ताजमहाल असेल तर तिची होणारी सासू ही कर्कशा आहे.

नीलमोहर's picture

1 Oct 2016 - 5:03 pm | नीलमोहर

ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते,
तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं,
तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा,
कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

किसन शिंदे's picture

1 Oct 2016 - 10:22 am | किसन शिंदे

अत्यंत बकवास मालिका.

विवेकपटाईत's picture

1 Oct 2016 - 11:24 am | विवेकपटाईत

सौ. सोबत एक दोन एपिसोड बघितले होते, मालिकेचे नाव , कळता काही कळेना असे ठेवायला पाहिजे होते.

सिरुसेरि's picture

1 Oct 2016 - 12:13 pm | सिरुसेरि

सुधारता प्रेक्षक सुधरेना

सरल मान's picture

1 Oct 2016 - 12:24 pm | सरल मान

आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

प्रसाद प्रसाद's picture

1 Oct 2016 - 12:38 pm | प्रसाद प्रसाद

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

नाखु's picture

1 Oct 2016 - 12:48 pm | नाखु

वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल.

अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे)

गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

प्रभाकर पेठकर's picture

1 Oct 2016 - 1:14 pm | प्रभाकर पेठकर

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

समी's picture

1 Oct 2016 - 2:40 pm | समी

जबरी विश्लेशण :))))))

अजया's picture

1 Oct 2016 - 4:23 pm | अजया

=)))

पैसा's picture

1 Oct 2016 - 4:34 pm | पैसा

=))

नीलमोहर's picture

1 Oct 2016 - 5:05 pm | नीलमोहर

मीठ उरलेला चिवडा !!

प्रशांत's picture

1 Oct 2016 - 5:25 pm | प्रशांत

काका दंडवत

पिलीयन रायडर's picture

3 Oct 2016 - 5:17 am | पिलीयन रायडर

=))

सस्नेह's picture

1 Oct 2016 - 2:52 pm | सस्नेह

खुळी झाले परीक्षण आणि प्रतिसाद वाचून !

ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय...
ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक's picture

1 Oct 2016 - 6:01 pm | उपयोजक

नावात मजा आहे.
खुलता कळी खुलेना!
बध्दकोष्ठच! दुसरं काय?
(कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2016 - 8:43 pm | टवाळ कार्टा

आत्ता घरात खुखुखु बघणे सुरु आहे, बिचार्या नायकाचा लग्न होऊनसुद्द्धा उपवास =))

माझीही शॅम्पेन's picture

12 Oct 2016 - 6:44 pm | माझीही शॅम्पेन

अरे बाबा गहन विषय आहे !!
One in the arm and one in bushes अस पण असु शकत ना

धर्मराजमुटके's picture

1 Oct 2016 - 8:53 pm | धर्मराजमुटके

नशीब. आज भांडा सौख्यभरे संपली..

चांदणे संदीप's picture

2 Oct 2016 - 7:47 am | चांदणे संदीप

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!!

Sandy

श्रीनिवास टिळक's picture

2 Oct 2016 - 6:04 pm | श्रीनिवास टिळक

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले's picture

3 Oct 2016 - 6:29 am | रमेश आठवले

झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी's picture

4 Oct 2016 - 2:51 pm | हर्मायनी

हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा !

म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;)

जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

माझीही शॅम्पेन's picture

4 Oct 2016 - 3:48 pm | माझीही शॅम्पेन

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती...
हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया's picture

5 Oct 2016 - 7:06 pm | अजया

हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते.
खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे.
उदाहरणार्थ
एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना.
एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व.
एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती.
एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स
सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त's picture

13 Oct 2016 - 7:21 am | चित्रगुप्त

एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा:
TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor)
https://youtu.be/ewFiQVw-IkY

(तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?