काय घेतलं, काय राहिलं?
हे लिखाण पर-प्रकाशितच. कुणी अनामिकाने* लिहिल्यानंतर WhatsApp वर आलेल्या एका स्फुटाला मुक्तकाचं रुप द्यावंसं वाटलं, दिलं.
काय घेतलं, काय राहिलं?
पर्स, फोन, किल्ल्या हाती
आई निघे पोटासाठी
पगार मिळेल हातात
कसे यावे शब्द ओठी
'सगळं घेतलंय दिवसासाठी',
तान्हं बाळ घरात!
मंडप जेंव्हा होतो रिता
आईचे डोळे आभाळ ओले
रिक्त खुर्च्या, आणि अक्षता
इतस्ततः पसरलेले
'काय राहिले' शोधी पिता
गौरीहाराशी मलूल फूले
'सारंच तर मागे राहीलंय आता!'