कुणासारखी तू, कुणासारखी...
कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.
तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.
कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.
तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.
नको रे नको
नको म्हटलं ना
नको
नक्को ना. नको.
अं हं
न
नको
न न
नको
नक्को ना रे
नको
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे
तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे.
हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने
हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे.
का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का?
तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे.
डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता
नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे.
रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू
तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे.
.
.
दीपक पवार.
एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते
चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.
रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन
चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण
तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते.
रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे
अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे
उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते.
पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.
बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.
रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.
तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने........
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा.
माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.
एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये
एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
सांजावता दाटते का तुझी आठवण?
जीवास या जाळते का तुझी आठवण?
होते तुझे गोड ते लाजणे ही
होते तुझे गोड ते हासणे ही
गेल्या सुखा माळते का तुझी आठवण?
वाऱ्यासवे शब्द येती तुझे हे
पर्णातुनी वाटते नांदती हे
गंधापरी वाहते का तुझी आठवण?
येती जशी पाऊले चांदण्याची
होते कशी काहिली ही मनाची
रातीस या भाळते का तुझी आठवण?
दीपक पवार.
अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ
अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ.
रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा
वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा
जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ.
संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे
रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे?
उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल.
छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू
ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू
कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.
भेटता रक्तस्त्राव हृदय फुले
कळाली अमर प्रेम कहाणी
"ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे
गात आहेत विरह गाणी
वेदना त्याच्या जीवाच्या
तेव्हांच मला कळाल्या
भंगून हृदय जेंव्हा
रक्त पाकळ्या गळाल्या
तू चालते अशी झाडावरची वेल ग
अंगावरती पानं फुलं ल्यायते ग
तू हसते अशी झरा वाहतो ग
खळखळाटानं हासणं पिकतं ग
तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग
येता येता सुगंघ आणतो ग
तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग
तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग
तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग
- पाषाणभेद
२९/०४/२०२२