मिलिंद भिड़े,भिलाई नगर
ज्या वाचकांना कुठल्या ही कारणा मुळे नियमित औषधोपचारा वर पैसे खर्च करावे लागतात त्यांच्या साठीच ही पोस्ट:
जीव वाचवायाच्या साठी प्रत्येक माणूस वाटेल ते करायला तयार असतो। इतर वेळेस पैश्यांवर पालथी मारून बसलेला अति चिक्कू माणूस ही मरण समोर दिसताच पाण्या सारखा पैसा ओततो, हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल ।
एखाद्या डॉक्टर ने लिहिलेली औषधे, दुकान विशेष मध्ये खरेदी करणारे बहुतांश आहेत, तर काही लोक तीच औषधे क्रेडिट वर, कैश डिस्काउंट सकट घ्यायच्या प्रयत्नात नेहमी असतात ।तर काही लोक मार्केट रिसर्च करून औषधे विकत घेतात।