मी आणि तू
मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता
तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला
आणि मी
मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून
इतरत्रच भटकत राहिले ...
मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता
तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला
आणि मी
मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून
इतरत्रच भटकत राहिले ...
नको तुझ्या दु:खाचे वर्णन
करूस माझ्यासमोर कधी -
शोध सुखाचा माझा चालू
ना पाहिले जे कधीच आधी ..
.
टाकून गेलीस एक कटाक्ष
जाता जाता तिकडे-
घालून गेलीस मनात
चांदण्यांचे सुगंधी सडे इकडे..
.
माझ्या मनाच्या अंगणात
अक्षरांच्या चिमण्या चिवचिवतात -
टिपून शब्दांचे दाणे
कविता बनून किलबिलतात..
.
. . विदेश
वाटे व्हावे उन्ह,फुलवावी धरा सारी
वाटे व्हावे मेघ तृप्त करावी धरा सारी
वाटे व्हावे मलय शितल करावी धरा सारी
वाटे व्हावे कवि आनंदवावी धरा सारी.
वाटे उडावे इंद्रधनु शोधाया
वाटे उडावे दवबिंदू शोधाया
वाटे उडावे मधुबिंदू शोधाया
वाटे उडावे मन: शांती शोधाया
काव्य हे स्फूराया हवे
हास्य हे फुटाया हवे
विचार हे प्रगटाया हवे
भाव हे फुलाया हव
काव्य शोधण्या हवे मन कोमल
हास्य शोधण्या हवे मन निर्मल
प्रेम शोधण्या हवे मन गंभीर
दुःख झेलण्या हवे मन खंबीर
डाॅ.राजा सोवनी.
वारा घोंघावत अवती
गिरकी देहाभोवती
कानात फुलांचे डूल
केसात माळत रानभूल
गीत गुंजन श्वासभर
पैजण नाद नभभर
.....कृष्णाची राधा डोलती...
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी
हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ
तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी
शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ
-प्राजक्ता
मदनाच्या भेटीला आज रती ही आली
चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली
तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली
दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.
2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.
3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.
तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .
तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.
एका कोपर्यात अंग फुगवून बसली होती सूरनळी
टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती ||
माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी ||
"
अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी
तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी
हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी ||
पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव
साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव
आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी ||
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला,
काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा.
रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा..
आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा..
"तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!