आणि अश्या वेळी
आणि अश्या वेळी,
चंद्राने लपायला हवं ढगांआड...
अन लपेटून घ्यायला हवं आपण,
भोवतालचं गुलाबी धुकं...
एकमेकांच्या श्वासांमधून
उधळायला हवीत,
प्रितीची गंधफुले...
घट्ट मिटायला हवीत,
डोळ्यांची नक्षत्रं...
टेकवायला हवेत
गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे,
ओठ एकमेकांवर...
आणि मग पहावं,
श्वास रोखले जातात की;
हृदय धडधडायचं थांबतं..?
-कौस्तुभ